विशेष प्रतिनिधी
मुंबई : विरोधक करणार भारताचा “बांगलादेश” आणि महाराष्ट्राचा “मणिपूर”; तरीही त्यांनाच सुरक्षा झेड प्लस!! असली अवस्था भारतात आली आहे. भारताचा “बांगलादेश” करण्याची भाषा शेतकरी आंदोलनाचे नेते महेंद्रसिंग टिकैत यांनी वापरली. Sharad pawar got central Z plus security
त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी महाराष्ट्राचा “मणिपूर” होण्याची भाषा वापरली होती. मात्र देशात सगळीकडे प्रचंड खदखद आणि असुरक्षित वातावरण असताना शरद पवारांसारख्या नेत्यालाच केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा पुरवली.
बदलापूरच्या घटनेवरून शिंदे – फडणवीस सरकारवर टीका करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मी आंदोलन करते, तर मला फाशी द्या. माझी सुरक्षा व्यवस्था काढून घ्या, पण महाराष्ट्रातल्या मुलींना सुरक्षा द्या अशी आक्रस्ताळी भाषा वापरली. प्रत्यक्षात केंद्र सरकारने शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा दिल्यानंतर त्यांनी ती स्वीकारल्याची बातमी समोर आली.
जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी भाजपकडून राम माधव, जी.किशन रेड्डींवर विशेष जबाबदारी!
शरद पवार यांना सध्या राज्याची झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. सीआरपीएफच्या काही अधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात चर्चा केली. यावेळी सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेचा आढावा घेत शरद पवार यांच्याशी संवाद साधला. या चर्चेअंती राज्यातील घडामोडी पाहता शरद पवार यांची सुरक्षा वाढवण्यात आली. त्यामुळे शरद पवार यांना केंद्राची झेड प्लस सुरक्षा दिल्यानंतर त्यांनी ती सुरक्षा स्वीकारली.
शरद पवार आगामी निवडणुकीत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरणार आहेत. शरद पवार काही महिन्यांपूर्वी मराठा नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी गेले होते. त्यावेळी रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. आगामी काळात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी शरद पवार यांच्यावर दिल्लीत एका तरुणाने त्यांना कानशिलात मारली होती. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे.
राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार कामाला लागले आहेत. ते राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. आगामी काळातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App