पवार घेतात बिन राज्यकीय गाठीभेटी, पण त्यामुळे विरोधी ऐक्य साधण्यापूर्वीच होतात फाटाफुटी!!, अशी महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात अवस्था आली आहे. कारण शरद पवार सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटून ज्येष्ठतेच्या नात्याने विरोधी ऐक्य साधण्याचा प्रयत्न करत असतानाच, दुसरीकडे त्यांनी अशा काही भेटीगाठी घेतल्यात की त्यामुळे विरोधी ऐक्य साधण्यापूर्वीच त्यातल्या फटी रुंदावल्या आहेत. Sharad pawar game plan to split opposition
शरद पवारांनी कालच घेतलेल्या दोन भेटीगाठी त्यांच्या राजकीय खेळीच्या निदर्शक आहेत. मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी पवार काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आणि त्या भेटीबद्दल काहीही न बोलता ते वर्षावरून निघून गेले. पण वर्षावरून ते घरी सिल्वर ओकवर पोहोचताच त्यांना भेटायला गौतम अदानी आले. दोघांमध्ये सिंगापूरच्या एका कंपनी संदर्भात काही तांत्रिक चर्चा झाली, असे पवारांचे म्हणणे आहे. या भेटीचा खुलासा आदानी कडून मात्र झालेला नाही. पवारांच्या या कालच्या दोन भेटीगाठीच विरोधी ऐक्यात पाचर मारण्यासाठी पुरेशा ठरल्या आहेत. कारण पवारांना अदानी त्यांच्या घरी जाऊन भेटले त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनी अदानी पवारांच्या घरी जाऊन राहिले काय?, तरी आम्हाला फरक पडत नाही आम्ही प्रश्न विचारत राहणार, अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याचा अर्थच अदानी – पवार ही केमिस्ट्री काँग्रेसला सध्याच्या डिस्पेन्सेशनमध्ये मान्य नाही.
त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे सध्या प्रदेश दौऱ्यावर आहेत, हा मोका साधून पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आणि त्यांच्याशी बिगर राजकीय चर्चा केली. यात मराठा मंदिर संस्थेचा अमृत महोत्सव हा विषय होताच पण महाराष्ट्रातले खेळाडू आणि कलावंतांच्या विषयावर देखील त्यांनी चर्चा केली, असे पवारांचे आणि शिंदेंचे म्हणणे आहे. ही ती बिगर राजकीय चर्चा होती पण या चर्चेसाठी उद्धव ठाकरेंच्या परदेश दौऱ्याचा “मुहूर्त” निवडण्याची चलाखी पवारांनी दाखवली. त्यावर मराठी माध्यमांमध्ये चर्चा घडवू दिली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे आपल्यासाठी कशी आहे हे दाखवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
पवारांना खरी धास्ती काँग्रेसच्या बळकटीकरणाची
पण पवारांच्या या राजकीय खेळीमागे एक विशिष्ट धास्ती दडली आहे, ती मराठी माध्यमांनी उलगडून सांगितलेली नाही, ती म्हणजे कर्नाटकात काँग्रेसने अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर भाजप पेक्षा पवारच जास्त धास्तावले आहेत. ते सावध झाले आहे. त्यांना महाराष्ट्रात काँग्रेसच्या वर्चस्वाची भीती वाटत आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसवर राष्ट्रवादीने मिळवलेला वरचष्मा तसाच टिकून ठेवण्यासाठी त्यांचा हा धडपडाट आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना संपल्यात जमा आहे. त्यामुळे त्यांना तशीही शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांना मध्येच विरोधी ऐक्याच्या मजधारेत सोडून देऊ पवारांनी एकनाथ शिंदे यांची संधान साधायला सुरुवात केली आहे. पण ते आता एवढे सोपे उरलेले नाही कारण एकनाथ शिंदे स्वयंभूपणे कोणता निर्णय 2024 च्या आत घेण्याची शक्यता नाही. तसा त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला तर भाजप शिंदे गटही फोडायला कमी करणार नाही ही राजकीय वस्तुस्थिती आहे.
एकीकडे पवारांनी शिंदे – अदानी यांची काल भेट घेऊन दुसरीकडे पवार 12 जून रोजी पाटण्यात होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत सामील होण्याच्या बातम्या आहेत. त्या दिवशी पवार कदाचित विरोधकांच्या बैठकीत सामील होतीलही. पण त्याआधी पवारांच्या आपल्या भेटीगाठींमधून विरोधी ऐक्यामध्ये जी पाचर मारून ठेवली आहे, त्यातून विरोधी ऐक्याच्या फटी अधिक रुंदावण्याचीच दाट शक्यता आहे आणि हीच कदाचित मोदींची पवारांना असाइनमेंट असू शकेल!!.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App