निवडणूक आयोगातल्या झुंजीची पुढची आवृत्ती; खुद्द शरद पवार गटाचीच प्रतिज्ञापत्रे खोटी!!; अजितदादांच्या वकिलांचा युक्तिवाद!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगातल्या झुंजीची पुढची आवृत्ती आज पार पडली. गेल्या आवृत्तीत अजित पवार गटाची खोटी प्रतिज्ञापत्रे शरद पवार गटाने उघड्यावर आणली होती. आजच्या सुनावणीच्या आवृत्तीत खुद्द शरद पवार गटाची प्रतिज्ञापत्रे खोटी आहेत, याचे नमुने दाखवत अजित पवार गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगात शरद पवारांच्या गटाला उघडे पाडले. Sharad pawar faction submitted false affidavits in election commission, alleged ajit pawar faction

निवडणूक आयोगात आज झालेल्या सुनावणीला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या सुनावणीत अजित पवार गटांकडून युक्तिवाद करताना त्यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी शरद पवार गटाची प्रतिज्ञापत्रे खोटी असल्याचा युक्तिवाद केला आणि त्याचे काही नमुने निवडणूक आयोगापुढे सादर केले.

शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत या दोन वकिलांनी युक्तिवाद केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापनाच मुळी शरद पवारांनी केली आहे, तर मग त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा काय असू शकतो??, असा अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला, तर सुप्रिया सुळे यांच्या कार्याध्यक्ष पदावरची नियुक्ती चुकीची असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी केला.

सोमवारच्या सुनावणीत काय झाले?

अभिषेक मनु सिंघवी : राज्य स्तरावरील 28 पैकी 20 पदाधिकारी आणि राष्ट्रीय कार्यकारिणीतील 86 पैकी 70 सदस्य शरद पवार यांच्यासोबत आहेत.

आम्ही आयोगात सादर केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्रे खरी आहेत. समोरच्या म्हणजे अजित पवार गटाकडून जसे खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले, तसे आम्ही केले नाही. हवे तर निवडणूक आयोग ते तपासू शकतो.

जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर शंका उपस्थित केली, ते अवैध आहे, असा अजित पवार गटाचा दावा आहे पण त्यांनी लढविलेल्या निवडणुकीसाठी जयंत पाटलांच्या सहीचे AB Form वापरले.

शरद पवार सोडून राष्ट्रवादी काँग्रेस असूच शकत नाही. ते अनेक वेळा मुख्यमंत्री, आमदार,खासदार, केंद्रीय मंत्री राहिले. त्यांनी स्वतःच या पक्षाची स्थापना केली. त्यांनीच पक्ष वाढविला. त्यामुळे शरद पावर सोडून राष्ट्रवादी दुसऱ्या कुणाची कशी काय होऊ शकते??

अजितदादा गटाचे मुकुल रोहतगी यांचे युक्तिवाद

खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी झालेली निवड ही पक्षाच्या घटनेच्या विरोधात जाऊन केली.

अजित पवार गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र देण्याचा देणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणून त्या प्रतिज्ञा पत्राचे मेरिट कमी होत नाही. त्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला म्हणजे मेरिट कमी झाले का??

शरद पवार यांच्या वतीने देखील निवडणूक आयोगात खोटे शपथपत्र दाखल करण्यात आले आहे. या खोट्या प्रतिज्ञा पत्राचा नमुना निवडणूक आयोगाने पाहावा.

आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी 30 जून रोजीच अजित पवार यांना समर्थन दिले आहे,
पण नंतर शरद पवार गटाने 19 ऑक्टोबरला मनोहर चंद्रिकापुरे यांना जबरदस्तीने आपल्या गटाला पाठिंबा देण्याचे प्रतिज्ञापत्र देणे भाग पाडले.

हे दोन्ही युक्तिवाद संपल्यानंतर पुन्हा एकदा निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे.

Sharad pawar faction submitted false affidavits in election commission, alleged ajit pawar faction

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात