Sharad pawar बारामतीतून घराण्यातली चौथी पिढी मैदानात आणत शरद पवारांनी महाराष्ट्राला दिली सत्ता परिवर्तनाची हाक!!

Sharad pawar

विशेष प्रतिनिधी

पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघातून आपल्याच घराण्यातली चौथी पिढी मैदानात आणत शरद पवारांनी महाराष्ट्राला दिली सत्ता परिवर्तनाची हाक!! Sharad pawar

बारामती विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावर पवारांनी आपलेच नातू युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवले. पवारांची चौथी पिढी बारामतीच्या राजकारणात सक्रिय केली. पवारांच्या मातोश्री शारदाबाई या पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. त्यानंतर खुद्द शरद पवार बारामतीतून आमदार झाले. नंतर खासदार झाले. पवारांची तिसरी पिढी अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे बारामतीतून आमदार आणि खासदार झाले. पवारांच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी रोहित पवार कर्जत जामखेड मधून आमदार झाले.

आता पवारांच्या घराण्यातले चौथ्या पिढीचे दुसरे प्रतिनिधी युगेंद्र पवार बारामतीतून अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठीच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. युगेंद्र पवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाची हाक दिली.

बाकी पवारांनी महाराष्ट्राच्या शिंदे – फडणवीस आणि पवार या भ्रष्ट सरकारची निर्भत्सना केली. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुतीला लाडक्या बहिणी आठवल्या, अशी टीका केली.

तुम्ही महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करा. महाविकास आघाडीच्या वतीने मी तुम्हाला आश्वासन देतो, की महाराष्ट्रात युवकांच्या हाताला रोजगार देणारे, बेरोजगारी घालवणारे, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणारे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे पुरोगामी सरकार आणू, असे पवार म्हणाले. मात्र त्यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण आणि कोणाच्या मनातला होणार??, या विषयावर कुठलीही भाष्य केले नाही.

Sharad pawar dynasty continues in baramati, brought in fourth generation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात