विशेष प्रतिनिधी
पुणे : आधी महाविकास आघाडीत पवारांनी टाकला 85 चा खोडा, पण काँग्रेसने चलाखीने पाय सोडवून घेतला. स्वतःचे 101 उमेदवार जाहीर केले, त्यावर आता महाविकास आघाडीत नेमके कोण किती जागा लढणार??, या प्रश्नावर पवारांनी हात वर केले!!
बारामती विधानसभा मतदारसंघातून पवारांची चौथी पिढी योगेंद्र पवारांच्या रूपाने मैदानात आणल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाची हाक दिली. मात्र त्यावेळी त्यांना पत्रकारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीत कोणते पक्ष नेमक्या किती जागा लढवणार??, हा सवाल केला त्यावर त्यांनी, “मलाच हे माहिती नाही”, असे सांगून हात वर केले.
वास्तविक महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष समान जागा लढवतील अशी टूम काढून पवारांनीच 85 चा खोडा टाकला होता. संजय राऊत, जयंत पाटील, नाना पटोले हे पवारांना सिल्वर ओकवर भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांनीच महाविकास आघाडीत तीन पक्ष प्रत्येकी 85 जागा लढवतील, असे तुम्ही जाहीर करून टाका. उरलेल्या जागांबाबत मित्र पक्षांशी चर्चा सुरू आहे, असे सांगा, अशी सूचना पवारांनी त्या नेत्यांना केली होती. त्यानुसार या सगळ्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन 85 चा फॉर्म्युला जाहीर केला, पण जयंत पाटलांनी कानात सांगून संजय राऊतांकडून ती बेरीज चुकवली. 255 ची बेरीज संजय राऊत यांनी 270 सांगितली. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या तिढा वाढला.
पण काँग्रेस नेत्यांनी अत्यंत चलाखीने पवारांचा “डाव” ओळखला. राहुल गांधींनी पर्सनली जागावाटपात लक्ष घातले. काँग्रेसने 101 जागांवर उमेदवार जाहीर करून टाकले. त्यानंतर पवारांनी आज महाविकास आघाडीत नेमके कोण किती जागा लढवणार??, या पत्रकारांनी विचारलेल्या सवालावर, “मलाच माहिती नाही”, असे सांगून हात वर केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App