नाशिक : वर्षानुवर्षे कब्जा करून बसलेल्या शरद पवारांच्या वर्चस्वाला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत खीळ बसली, हेच खरे महाराष्ट्र केसरीच्या वादाचे मूळ असल्याचे आता उघड्यावर आले आहे. कारण महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये झालेल्या वादातून आता समांतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवायची तयारी रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आहे. किंबहुना रोहित पवारांचा मतदारसंघ कर्जत जामखेड मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरविण्याचे जाहीर देखील केले आहे.
आमदार रोहित पवार, कर्जत तालुका तालीम संघ आणि नगर जिल्हा तालीम संघ यांनी संयुक्तरीत्या ही स्पर्धा आयोजित केली आहे. तिला 66 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा असे नाव दिले आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना यांच्या मान्यतेने ही स्पर्धा भरवली जात असल्याचे संयोजकांनी सांगितले असले, तरी अद्याप राज्य कुस्तीगीर परिषदेने त्याला मान्यता दिली आहे अथवा नाही, याविषयीचा तपशील बाहेर आलेला नाही.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच अहिल्यानगर मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी बनला. पण या स्पर्धेत शिवराज राक्षेने पंचांना मारलेली लाथ हा विषय सगळ्यात वादग्रस्त बनला. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षेला तीन वर्षांसाठी बंदी घातली.
या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतला जुना वाद उफाळून आला. माजी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी तर गदा वापसीची भूमिका जाहीर केली. काका पवार यांनी महाराष्ट्र केसरी आधीच ठरत असतो, असे सांगून वादात भर घातली. त्यानंतर आमदार रोहित पवारांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही पहिलवानांवर अन्याय करणारी ठरली. आम्ही शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत जामखेड मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करू, असे जाहीर केले. त्यानुसार कर्जत जामखेड मध्ये 27 ते 30 मार्च दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धा राहणार आहे.
पण ही समांतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा असणार आहे. कारण रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या अधिकृत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने रोहित पवारांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला अधिमान्यता दिली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पवारांच्या वर्चस्वाला खीळ
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर शरद पवारांचे वर्षानुवर्षे वर्चस्व होते. ते अनेक वर्षे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. त्या कालावधीमध्ये कुस्तीगीर परिषदेमध्ये राजकारण झाले, मल्लांवर अन्याय झाला, वगैरे बाता कोणी मारल्या नाहीत. जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत वाद झाला… कारण राजकारण!!, अशा सोशल मीडिया पोस्ट केल्या नाहीत. पण 2023 मध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवरचे शरद पवारांचे वर्चस्व संपुष्टात आले. भाजपचे माजी खासदार रामदास तडस महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर पवार समर्थकांना “अचानक” कुस्तीगीर परिषदेत आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेत “राजकारण” शिरल्याचे “साक्षात्कार” व्हायला लागले. पुरस्कार वापसी सारखे गदा वापसी उपक्रम सुचायला लागले. त्यातूनच अहिल्यानगर मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा वाद उफाळून आला आणि त्याचे पडसाद आता कर्जत जामखेड मध्ये समांतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याचे जाहीर करून उमटवण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App