विशेष प्रतिनिधी
बारामती : गोविंद बागेतल्या दिवाळी समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार आले नाहीत. त्यावर अर्धा ग्लास रिकामा नाही, तर भरलेला म्हणायचा, असे उत्तर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. मात्र अजितदादांचे नाव घेणे शरद पवारांनी टाळले. उलट तुम्ही स्थानिक आहात. मला भेटायला येणाऱ्या लोकांमध्ये काही कमतरता आहे का??, असा सवाल पवारांनी पत्रकारांना केला. sharad Pawar avoided taking Ajit pawar name
पाडव्या निमित्ताने पवार कुटुंबातील लोक एकत्र आले आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार पहिल्यांदाच गोविंदबागेत आले नाहीत. रोहित पवार बीडला असल्याने ते आले नाहीत, तर अजित पवार हे आजारी असल्याने गोविंद बागेत आले नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
शरद पवार यांनी त्याबाबत भाष्य केले. यावेळी पवारांनी रोहित पवारांच्या नावाचा उल्लेख केला, पण अजितदादांचे नाव घेणे टाळले. काही कामे असतील. रोहितचा दौरा सुरू आहे. प्रत्येकाची काही कामे आहेत, कुणाचा आजार असेल. त्यामुळे समज – गैरसमज करण्याचे कारण नाही. तुम्ही स्थानिक आहात. आज मला लोक भेटायला आलेले पाहिले. त्यात काही कमतरता दिसली का??, असा सवालही शरद पवारांनी पत्रकारांना केला.
शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला अमित शाहांच्या भेटीसाठी
तसा वाद नाही
राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू झाला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केले तसा वाद लोकांमध्ये नाही. काही लोक तसे वातावरण करत आहेत. पण सामान्य लोकांना त्यात रस नाही. लोकांना त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, यातच रस आहे. ओबीसी असो की मराठा असो त्यांचे न्याय प्रश्न राज्य आणि केंद्राने सोडावावे ही अपेक्षा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले.
तर वातावरण सुधारेल
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मला निमंत्रण होतं. त्याला विविध पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना जी अपेक्षा होती. त्याची पूर्तता करण्याची भूमिका मांडली. त्याबाबत पाऊल टाकतो असं मुख्यमंत्री म्हणाले. तो निर्णय त्यांनी लवकर घेतला तर वातावरण सुधारेल, असंही ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App