विशेष प्रतिनिधी
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक झालेले शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट त्यांच्यावर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वार करून देखील मोदींविरोधात बचावात्मकच पावित्र्यात आले. इतकेच नाही, तर परस्पर टिळक पुरस्कार जाहीर करून त्यांनी औचित्यभंगही केला. Sharad pawar attacking fadnavis, but defensive on Modi
पुण्यातल्या पत्रकार परिषदेत पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर “गुगली प्रयोग” केल्याच्या डिंग्या मारल्या. त्याचवेळी आपली मुलगी स्वकर्तृत्वावर तीनदा संसदेत पोहोचल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुनावले. पण त्याच वेळी मोदींशी आपले वैयक्तिक भांडण नाही, असे सांगायलाही त्यांनी त्याच पत्रकार परिषदेचीच वेळ निवडली.
इतकेच नाही तर मोदींशी आपले व्यक्तिगत कसे उत्तम संबंध आहेत, याचा हवाला पुन्हा एकदा दिला. मोदींना 1 ऑगस्टच्या लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी आपण निमंत्रण दिले आहे आणि ते त्या कार्यक्रमाला येणार आहेत, असे पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लोकमान्य टिळक पुरस्काराचा कार्यक्रम केव्हा आहे?, आपल्याशी कोणी संपर्क साधला आणि मग आपण मोदींशी कसे बोललो?, त्याचे सविस्तर वर्णन पवारांनी केले.
नागरिकांना चकरा मारायला लागू नये यासाठीच ‘शासन आपल्या दारी’ अभियान : देवेंद्र फडणवीस
रोहित टिळक आपल्याकडे आले होते. त्यांना मोदींना टिळक पुरस्कार द्यायचा आहे. पण त्यांचा डायरेक्ट अप्रोच मोदींशी नाही. त्यामुळे ते आपल्याकडे आले आणि आपण मोदींना फोन करून 1 ऑगस्टच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. ते त्यांनी स्वीकारले, असे पवारांनी याच पत्रकार परिषदेत आवर्जून सांगितले. वर मोदींनी आता सुप्रिया सुळे आणि आपल्यावर टीका केल्याने त्यांचे मन बदलले असेल तर माहिती नाही, असा स्वतःसाठी “एस्केप रूट” अर्थात पळवाट तयार करून ठेवली. पण या सर्व प्रकारात पवारांनी एक मोठा औचित्यभंग केला.
वास्तविक लोकमान्य टिळक पुरस्काराची घोषणा ही टिळक परिवारातील प्रमुख या नात्याने सुरुवातीला (कै.) जयंतराव टिळक करायचे. कारण 1982 मध्ये हा पुरस्कार त्यांनी सुरू केला. जयंतरावांच्या निधनानंतर नंतर डॉ. दीपक टिळक पुरस्काराची घोषणा करायचे आणि आता ती घोषणा रोहित टिळक करतात. पण पवारांनी मात्र मोदींशी आपली जवळीक कशी आहे, हे दाखविण्याच्या नादात कालच्याच पत्रकार परिषदेत टिळक पुरस्कार परस्पर जाहीर करून मोठा औचित्यभंग देखील केला.
फडणवीसांवर मात्र त्यांनी आपला दात कायम ठेवला. पण आपल्या नेहमीच्या स्टाईलने आपली मोदींची कशी जवळीक आहे आणि मोदींविरोधात आपले वैयक्तिक काहीही मतभेद नाहीत, असे सांगून बचावात्मक पवित्र्यात असल्याचेच पवारांनी अप्रत्यक्षपणे दाखवून दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App