प्रतिनिधी
मुंबई – राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर जातीवाद वाढीस लागल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर महाराष्ट्रात वाद पेटला असून संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समान उत्तर दिले आहे. ब्राह्मण – ब्राह्मणेतर वादाचा विषय उकरून त्यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.sharad pawar and sambhaji brigade targets raj thackeray in the same political manner
राज ठाकरे यांनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे, असा सल्ला शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दिला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी देखील नेमका हाच सल्ला राज ठाकरे यांना फेसबुक पेजवरून दिला.
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षण ते राज ठाकरे या सर्व मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी राज ठाकरे यांना नेमका तोच सल्ला दिला. फेसबुक पेजवर ते म्हणतात, राज ठाकरेंना जसे बाबासाहेब पुरंदरेंच्या ब्राह्मणी इतिहासाच्या पलिकडचे आकलन नाही. त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही.
राजकारणात कोणतेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे.
कोण जेम्स लेन…??
जेम्स लेनच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना राज ठाकरे यांनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरले होते. ते म्हणाले होते, की राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झाला आहे. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला.
कोण हा जेम्स लेन? त्याने पुस्तक लिहिले. तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? तो आता कोण आहे? कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणातून हे सगळे डिझाईन झालेय त्यातून शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा सांगितला गेला, ते करणारे अमुक जातीचे लोक आहेत वगैरे बोलले जाऊ लागले, अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगितली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App