ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याच्या मागणीला पवार + नानांकडून वाटाण्याच्या अक्षता!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ज्याचा जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला नको. भाजपबरोबरच्या अनुभवाची पुनरावृत्ती नको, असे सांगत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच मेळाव्यात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीमुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली. Sharad pawar and nana patole rejects uddhav thackeray’s demand of CM face

परंतु शरद पवार आणि नाना पटोले यांनी मेळाव्यात जाहीर भाषणे करत मुख्यमंत्रीपदाच्या चेहरा जाहीर करण्याच्या उद्धव ठाकरेंच्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पहिल्या मेळाव्यातच वादाची ठिणगी पडली. शरद पवार आणि नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याला नकार दिला.

लोकसभा निवडणुकीतल्या मोठ्या यशानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने महाविकास आघाडीचा पहिला एकत्रित मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये झाला. या मेळाव्याचे यजमानपद शिवसेनेकडे असल्यामुळे उद्धव ठाकरेंनी उद्घाटनाचे भाषण केले. या उद्घाटनाच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी सुरुवातीलाच महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा.

शरद पवार आणि पृथ्वीराज बाबांनी जाहीर केलेला उमेदवार आम्ही मान्य करून त्याला पाठिंबा देऊ, असे सांगितले. भाजपबरोबरची 20 – 25 वर्षांची युती होती. परंतु, ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला त्यांनी लादला. त्यांच्याबरोबरचा अनुभव कटू होता. तसे महाविकास आघाडीच्या बाबतीत व्हायला नको, असे सांगत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर ठेवली. त्यावेळी नाना पटोले व्यासपीठावर हजार नव्हते परंतु नाना व्यासपीठावर आल्यानंतर देखील भाषणाचा समारोप करताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची मागणी पुढे रेटली.


Nepal Prime Minister : नेपाळच्या पंतप्रधानांनी भारताला स्वातंत्र्य दिनाच्या दिल्या शुभेच्छा


उद्धव ठाकरेंचे भाषण झाल्यानंतर बाकीच्या अनेक नेत्यांची भाषणे झाली. यात जयंत पाटील, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड यांचा समावेश होता. या नेत्यांनी मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला हवा देण्याचे कारणच नव्हते.

परंतु नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्रीपदाचा विषय येणे अपरिहार्य होते, तसा तो आला. परंतु आपले ध्येय महायुतीचे सरकार घालवायचे आणि महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे ते सरकार आणल्यानंतर मुख्यमंत्री आपण ठरवू शकतो. विधानसभा निवडणुकीनंतर सगळे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री ठरवतील, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली.

शरद पवारांनी आपल्या भाषणात तर त्या विषयाला स्पर्श देखील केला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याच्या मागणीला पवारांनी बगल दिली. एकूणच उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वाटण्याच्या अक्षता लावल्याने ठाकरेंची पुढची वाटचाल महाविकास आघाडीत किंवा महाविकास आघाडीच्या बाहेर कशी राहील??, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Sharad pawar and nana patole rejects uddhav thackeray’s demand of CM face

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात