विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधान परिषदेतले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या एसटी बॅंक निवडणुकीवरून गंभीर आरोप केला आहे. “Shakuni Kaka” plot to grab Rs 2,000 crore bank and assets; Serious allegations of Padalkar
मागील 6 महिन्यांपासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता. आता “शकुनी काकां”नी याचाच फायदा उचलून 2000 कोटींची बँक आणि त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे. बँकेची निवडणूक जासीर केली आहे आणि जे सदस्य थकबाकीदार आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही, असा फतवा काढला आहे, असे पडळकरांनी म्हटले आहे.
साहाजिकच जे कर्मचारी बिनपगारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते, तेच थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही. १९९५ ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वत:च्याच एकमेव संघटनेला मान्यताप्राप्त करून दिली आणि सभासद फीच्या नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रूपये वसूल केले. त्या व्यतिरिक्त अधिवेशनाखाली ५०० रूपये व वाढदिवसानिमित्त मनसोक्त रक्कम गोळा केली. अशा वेगवेगळ्या मार्गाने जवळपास १०० कोटी रूपये गिळंकृत केल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे.
त्यातूनच वर्षाआड आपल्याच बगलबच्च्यांना २०-२० लाखांच्या आलीशान गाड्या खरेदी करून दिल्या. पण ज्यावेळी एसटी कामगार व त्यांचा परिवार उपाशी पोटी उघड्यावर लढा देत होता, त्यावेळेस या संघटेनेचे सर्वेसर्वा यांनी माणुसकीखातीर आपल्या सिल्वर ओकवरून एक वेळचे जेवण तर सोडा पण साधे चहापाणी सुद्धा पाठवले नाही. जर यांच्यात माणुसकी शिल्लक असती, तर यांनी त्या १३५ विधवा भगिनींना आर्थिक मदत दिली असती. अशा मुघलाई प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवून कायदेशीररित्या यांचा डाव उधळून लावणार आहोत, असा इशारा पडळकर यांनी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App