विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना महाविकास आघाडीत खेचून घेऊन त्यांच्या काळात त्यांच्या गळ्यात माढाची उमेदवारी घालून महायुतीत सुरुंग लावण्याचा शरद पवारांचा प्रयत्न आज फसला. महादेव जानकर यांचे तळ्यात मळ्यात संपून आज अखेर जानकर महायुतीच राहिले. set back for sharad pawar mahadev jankar will remain in mahayutia seat allocation decided
विशेष म्हणजे महादेव जानकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे महादेव जानकर महाविकास आघाडीतून माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. या सर्व चर्चा आज आज फोल ठरल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या “वर्षा” या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे हे उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली. यावेळी महादेव जानकर यांच्या पक्षाला एक जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ही बैठक सुरु असताना सुनील तटकरे आणि महादेव जानकर “वर्षा” बंगल्याबाहेर आले. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली. महादेव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
महादेव जानकर यांनी आपण महायुती सोबतच राहणार असल्याचा निर्वाळा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झाला आणि त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण मोदीजी यांच्यासोबत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असेही महादेव जानकर यांनी सांगितले.
सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
“राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अध्यक्ष महादेव जानकर, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली. या बैठकीत आम्ही सविस्तर विविध विषयांवर चर्चा केली. महादेव जानकर यांनी महायुतीच राहणार असल्याचा निर्वाळा बैठकीत दिला. महायुतीमार्फत लोकसभेची एक जागा रासपला देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्ही एक-दोन दिवसांत महायुतीचे जागावाटप जाहीर करु. त्यावेळी कोणत्या मतदारसंघात रासपला संधी दिली जाईल याबाबत तपशील मिळेल. या निर्णयामुळे महायुती अधिक बळकट होण्यास आम्हाला सहकार्य मिळेलच. राज्यभरात लोकसभा निवडणुकीत त्यांचं मोठं योगदान असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.
मी आधी महायुतीतच होतो. दबावतंत्राचा वापर बिलकूल नाही. मी शरद पवारांचे आभार मानतो. कोणत्या जागेवरुन लढायचं ते लवकरच जाहीर होईल, अशी प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यांना दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App