वरिष्ठ आयपीएस अधिकारी दिगंबर प्रधान (वय 54 )यांचा रविवारी रात्री पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात त्यांची दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात झाला.
प्रतिनिधी
पुणे -वरिष्ठ आयपीएस अधिकारी दिगंबर प्रधान (वय 54 )यांचा रविवारी रात्री पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पानमळा परिसरात त्यांची दुचाकी दुभाजकाला धडकून अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.Senior IPS officer Digambar Pradhan Injured in road accident now admited in ICU
अपघातामध्ये ते बेशुध्द झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्रधान यांची नुकतीच गृह विभागातून पीएमआरडीत वरिष्ठ अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. दत्तवाडी पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक विजय खोमणे यांनी सांगितले,
वरिष्ठ पोलिस अधिकारी दिगंबर प्रधान हे रविवारी रात्री आपल्या आनंदनगर येथील राहत्या घरी सिंहगड रस्त्याने जात होते. त्यावेळी पानमळा येथे त्यांना अंधारात दुभाजक असल्याचे न दिसल्याने त्यांची दुचाकी दुभाजकाला धडकली. यातच त्यांचा अपघात झाला. त्यांना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे खोमणे म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App