विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या उमेदवार यादीमध्ये एकूण 11 जणांचा समावेश आहे. वंचितच्या पहिल्या यादीप्रमाणेच दुसऱ्या यादीतही समाजातील सर्व जाती-घटकांना स्थान मिळेल, याची काळजी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे वंचितच्या दुसऱ्या यादीतही लोकसभा उमेदवारांच्या नावापुढे त्यांची जात नमूद करण्यात आली आहे.Second List of Lok Sabha Candidates of Vanchit; Names of 11 persons; Mahavikas Aghadi will be hit
वंचितच्या पहिल्या लोकसभा उमेदवार यादीत 8 जणांचा समावेश होता, तर दुसऱ्या उमेदवार यादीत 11 जणांचा समावेश आहे. त्यामुळे वंचितने आतापर्यंत लोकसभेचे 19 उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीसोबत युतीची बोलणी सुरु असताना प्रकाश आंबडेकर यांनी लोकसभेच्या 27 मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीकडे विजय मिळवण्याइतकी ताकद असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आतापर्यंत वंचितने 19 लोकसभा उमेदवार जाहीर केले आहेत.
दुसऱ्या यादीतील लोकसभेचे उमेदवार कोण?
हिंगोली – डॉ. बी. डी. चव्हाण – बंजारा लातूर – नरसिंहराव उदगीरकर – मातंग सोलापूर – राहुल काशिनाथ गायकवाड – बौद्ध माढा – रमेश नागनाथ बारसकर – माळी (लिंगायत) सातारा – मारुती धोंडीराम जानकर – धनगर धुळे – अब्दुर रहमान – मुस्लीम हातकलंगणे – दादासाहेब पाटील – जैन रावेर – संजय पंडीत ब्राम्हणे – बौद्ध जालना – प्रभाकर देवमन बकले – धनगर मुंबई उत्तर मध्य – अबु हसन खान – मुस्लीम रत्नागिरी सिंधुदुर्ग – काका जोशी – कुणबी
मविआला मोठा फटका बसण्याची शक्यता
वंचित बहुजन आघाडीने तब्बल 19 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केल्याने महाविकास आघाडीला त्याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. कारण वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी या दोघांना महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करायचा आहे. महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करणं ही दोघांची प्राथमिकता आहे. यासाठी दोघांनी एकत्र येणं आवश्यक होतं. पण जागावाटपात एकमत न झाल्याने आता प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. पण त्यांच्या या मार्गाचा सर्वाधिक फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. तसेच महाविकास आघाडीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App