नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त प्रख्यात अभिनेता रणदीप हुडा याचा फर्स्ट “सावरकर” लूक आऊट झाला आहे!! आनंद पंडित मोशन पिक्चर्सच्या आगामी स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमातला हा लूक असून हा सिनेमा प्रख्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर दिग्दर्शित करणार आहे. रणदीपने आपल्या ट्विटर हँडलवर आपला पहिला सावरकर लूक शेअर केला आहे. Savarkar: Randeep Hooda’s first “Savarkar” look out !!; Randeep is working hard !!
सावरकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना एक आयकॉनिक क्रांतिकारक, महान स्वतंत्रता सेनानी आणि आत्तापर्यंत इतिहासातून पुसून टाकण्याचा प्रयत्न झालेले महान व्यक्तिमत्व अशा शब्दात त्याने सावरकर यांचे वर्णन केले आहे. सावरकरांवरचा चरित्र चित्रपटात भूमिका करणे हे आपल्यासाठी फार मोठे आव्हान आणि त्यांचा आशीर्वाद आहे. एका महान व्यक्तिमत्वाला केवळ राजकीय कारणांसाठी इतिहासातून पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यांचे योगदान भारतीय जनते समोर आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे रणदिवे ट्विटमध्ये म्हटले आहे.
– द काश्मीर फाइल्स
संदीप सिंगने स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाची तुलना “द काश्मीर फाईल्स” शी केली आहे. काश्मीर फाइल्स सिनेमा बनत असताना कोणीही त्याच्या यशस्वितेची कल्पनाही केली नव्हती. परंतु जनतेने तो सिनेमा उचलून धरला. काश्मिरी जनतेच्या भावना समजून घेतल्या. आम्ही काश्मीर काश्मीर फाइल्स या सिनेमाशी स्पर्धा करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा बनवत नाही आहोत पण सावरकरांचे खरे आयुष्य आणि त्यांचे विचार समस्त भारतीयांसमोर आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. भारतरत्न आणि नोबेल पुरस्कार यांच्या पलिकडचे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते, असे संदीप सिंग यांनी म्हटले आहे. ऑगस्टमध्ये या सिनेमाचे प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू होणार असून त्यातले पहिले कास्टिंग सावरकर व्यक्तिरेखा रेखाटण्यासाठी रणदीप हुडाची निवड महेश मांजरेकर यांनी केली आहे.
A salute to one of the tallest unsung heroes of India’s struggle for freedom & self-actualisation. hope I can live up to the challenge of filling such big shoes of a true revolutionary & tell his real story which had been brushed under the carpet for so long#VeerSavarkarJayanti pic.twitter.com/EaiDWQyeLZ — Randeep Hooda (@RandeepHooda) May 28, 2022
A salute to one of the tallest unsung heroes of India’s struggle for freedom & self-actualisation. hope I can live up to the challenge of filling such big shoes of a true revolutionary & tell his real story which had been brushed under the carpet for so long#VeerSavarkarJayanti pic.twitter.com/EaiDWQyeLZ
— Randeep Hooda (@RandeepHooda) May 28, 2022
– सावरकर भूमिकेसाठी रणदीपची तयारी
सावरकरांची व्यक्तिरेखा निभावण्यासाठी रणदीप हुडाने प्रचंड तयारी केली असून त्याने सुरुवातीला 10 किलो वजन कमी केले आहे. येत्या 2 महिन्यात तो आणखी 12 किलो वजन कमी करणार आहे. रणदीपने आपले उच्चार मराठी धाटणीचे करण्यासाठी खास प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. प्रोडक्शनची टीम यासाठी रणदीप बरोबर पुढचे 3 महिने काम करणार आहे.
– अनेकांची मेहनत
रणदीपच्या “सावरकर” फर्स्ट लूक साठी ॲश्ले रेबेलो याने कॉस्च्युम डिझाईन केले आहे. विकी इद्यानीने फोटोग्राफी केली आहे, तर रेणुका पिल्लईने रणदीपचा मेकअप केला आहे. सावरकरांची व्यक्तिरेखा लार्जर दॅन लाईफ आहे. ती साकारणे हे मोठे आव्हान असले तरी ती संधी आहे आणि यासाठी अनेक लोक मेहनत घेत आहेत. यातून ही भूमिका यशस्वी होईल, असा विश्वास रणदीप हूडा याने व्यक्त केला आहे.
– अनेक बायोपिक मध्ये काम
रणदीप हूडा याने या आधी अनेक बायोपिक मध्ये काम केले आहे. रंगरसिया या बायोपिक मध्ये त्याने प्रख्यात चित्रकार राजा रविवर्मा यांची भूमिका साकारली होती. सरबजीत सिनेमात त्याने स्वतः सरबजीतची भूमिका केली होती. या दोन्ही भूमिका प्रचंड गाजल्या आहेत.
हत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App