विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांनी पक्ष नेतृत्वाला कात्रजचा घाट दाखवून नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि मराठी माध्यमांच्या राजकीय रसवंतीला बहर आला आहे. काँग्रेसच्या गढी वाडयातून तांबे पितळ बाहेर पडल्याची भाषा मराठी माध्यमांनी वापरली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना मराठी माध्यमे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सल्ला देऊ लागले आहेत. Satyajit Tambe issue embarrasses Congress, but Nawab Malik, Mohamed Faisal and Hassan Mushrif’s crimes embarrassed NCP more!!
विरोधी पक्ष नेते अजितदादांनी तर सांगूनच टाकले, की मी बाळासाहेब थोरात यांना काही दिवसांपूर्वीच नाशिक मध्ये काहीतरी वेगळे शिजत असल्याचा इशारा दिला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी आम्ही आमच्या पक्षातले व्यवस्थित सगळे बघून घेऊ. सुधीर तांबे काँग्रेसचा उमेदवारी अर्ज भरतील, असे मला सांगितले होते, असे अजितदादांनी पत्रकारांना सांगितले.
पण प्रत्यक्षात घडले भलतेच. सुधीर तांबेंनी काँग्रेसचा एबी फॉर्म आपल्या जवळच ठेवला आणि मुलगा सत्यजित याचा फॉर्म अपक्ष म्हणून भरला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाणक्य खेळी करून घेतली आणि भाजप नामानिराळा झाला. पण या निमित्ताने मराठी माध्यमांनी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसला उपदेशात्मक भाषा वापरून घेतली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि माजी मंत्री अमित देशमुख भाजपात जाण्याची चर्चा वाढल्यानंतर त्यांनी बाभळगावच्या आपल्या गढीचा फोटो शेअर करून ती मजबूत असल्याचा हवाला दिला होता. पण आता त्या गढीवरूनच श्लेष काढून मराठी माध्यमांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे.
मध्यंतरी शरद पवारांनी काँग्रेसची अवस्था जुन्या जमीनदारासारखी झाली आहे. त्याचा गढी वाडा शिल्लक आहे. पण बहुतांशी सगळी जमीन त्याची उरलेली नाही. पण त्या जमीनदाराला असे वाटते, की हे सगळे शिवार आपलेच आहे. असेच काँग्रेस नेत्यांनाही वाटत असल्याची टीका पवारांनी केली होती आणि त्याच टीकेचा आधार घेऊन काँग्रेसच्या गढी वाड्यातून तांबे पितळे बाहेर पडल्याची खिल्ली मराठी माध्यमांनी उडवली आहे.
राष्ट्रवादीच्या “मंज़िल” मधून “हे” नेते “आत”
पण एकीकडे हे घडत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या “मंज़िल” मधून मात्र मलिक, फैजल, मुश्रीफ असे नेते तुरुंगात गेले किंवा तुरुंगात जायच्या वाटेवर आहेत, हे मात्र मराठी माध्यमांना दिसलेले नाही!! किंवा दिसूनही त्यांनी ते बघितले नाही. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांना जसा माध्यमांनी उपदेश केलाय, तसा उपदेश माध्यमे पवारांना करू शकत नाहीत. पण म्हणून राष्ट्रवादीच्या मंज़िल मधली वस्तुस्थिती बदलत नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक हे दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉन्ड्रिंग केल्याबद्दल तुरुंगात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीप मधले खासदार मोहम्मद फजल यांना काँग्रेस नेत्याच्या हत्येच्या प्रयत्नात 10 वर्षांची सक्तमजुरी आणि 1 लाख रुपयांचा दंड झाला आहे. ही शिक्षा झाल्याबरोबर मोहम्मद फैजल यांची खासदारकी पण रद्द झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतले संख्याबळ त्यामुळे घटले आहे. हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडी आणि इन्कम टॅक्सने छापे घातले आहेत. साखर कारखाना घोटाळा प्रकरणात कोलकत्याच्या बनावट कंपन्यांमध्ये कोट्यावधी रुपये गुंतवण्याचे हे प्रकरण आहे आणि त्या कंपन्या ईडीच्या रडारवर आल्या आहेत. हसन मुश्रीफ हे तुरुंगाच्या वाटेवर आहेत.
एकूण राष्ट्रवादीच्या मंज़िल मधले बडे नेते नवाब मलिक, मोहम्मद फैजल आणि हसन मुश्रीफ हे एकतर तुरुंगात आहेत किंवा तुरुंगाच्या वाटेवर आहेत. पण मराठी माध्यमांनी मात्र राष्ट्रवादीच्या “मंज़िल” मधून बाहेर पडून तुरुंगाच्या वाटेवरची ही कहाणी अद्याप तरी सांगितलेली नाही. काँग्रेसच्या गढी वाडयातून तांबे पितळ बाहेर पडले असेल, तर राष्ट्रवादीच्या “मंज़िल” मधून बडे नेते आत मध्ये गेले आहेत किंवा जाण्याच्या वाटेवर आहेत. हे राष्ट्रवादीचे भवितव्य आहे. मराठी माध्यमांना ते दिसले नाही किंवा ते दिसून सुद्धा मराठी माध्यमांनी बघितले नाही, इतकेच!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App