विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त अनेकांनी ज्येष्ठांनी आणि वरिष्ठांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अशा शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी बाबासाहेबांना आदरापोटी शुभेच्छा दिल्या खऱ्या परंतु त्यानंतर ते लगेच सोशल मीडियावर ट्रोल व्हायला सुरुवात झाली. Satyajit Tambe became a troll after congratulating Babasaheb Purandare; Immediately wrote a letter of disclosure … !!
त्यामुळे ते अस्वस्थ झाले. ही अस्वस्थता वाढल्यावर सत्यजित तांबे यांनी ट्रोलिंग करणाऱ्या समुदायाला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना केवळ वयाच्या आदरापोटी शुभेच्छा दिल्याचे स्पष्ट करून टाकले. बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मी समर्थन करीत नाही, कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी मांडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मी समर्थन करतो असे लिहून सत्यजित तांबे मोकळे झाले.
बाबासाहेब पुरंदरे यांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय पु ल देशपांडे यांच्यासारख्या भिन्न भिन्न विचारसरणींच्या नेत्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला होता, याची आठवण सत्यजित तांबे यांनी ट्रोलिंग करणाऱ्या समुदायाला करून दिली आहे.
विचारात भिन्नता असली तरी आपल्यामध्ये एकमेकांचे विचार समजून घेण्यात एवढा आदर व सहिष्णूता हवी. मतभेद असले तरी सर्वसामान्यपणे शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे?, असा सवाल सत्यजित तांबे यांनी पत्रातून केला आहे. समाज म्हणून आपण तेवढी प्रगल्भता दाखवली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि विचारवंतांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र महाराष्ट्रातील काँग्रेस – राष्ट्रवादी विचारसरणीच्या नेत्यांनी शुभेच्छा देणे टाळले होते. या पार्श्वभूमीवर सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसचेच्या पदावर राहूनही बाबासाहेबांना शुभेच्छा दिल्या. यावरून त्यांच्याच काँग्रेस विचारसरणीच्या समर्थकांकडून ते अधिक ट्रोल झाले. त्या वेदनेतूनच सत्यजित तांबे यांनी खुलासा करणारे पत्र लिहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App