या कारणासाठी सोमय्यांना कोल्हापुरात येण्यास बंदी घातली होती! सतेज पाटील यांनी व्यक्त केले मत


विशेष प्रतिनिधी  

सोलापूर : किरीट सोमय्या हे नाव मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. कधी हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तर कधी अनिल परब यांना ईडीची सुनावणी आल्यानंतर केलेल्या ट्वीटमुळे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या उद्या म्हणजे 27 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. त्याविषयी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Satej Patil told reason why kirit somaiya was banned in kolhapur district

‘कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. सोमय्यांच्या मागील दौऱ्यासंबंधी कोणतेही वेळापत्रक कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला मिळाले नव्हते. याविषयी हसन मुश्रीफ यांनी देखील आपले मत स्पष्ट केले, असे सतेज पाटील यांनी सांगितले आहे. कोल्हापूरमध्ये येण्यासाठी आता त्यांना बंदी नाही आणि कोणीही त्यांची अडवणूक देखील करणार नाही असेही सतेज पाटील म्हणाले आहेत.


सर्वजण मिळून भीषण पूरपरिस्थितीवर मात करूया सतेज पाटील यांचे आवाहन


आरोग्य विभागाच्या परीक्षा अचानकपणे रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करताना सतेज पाटील म्हणतात की, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील या संदर्भातील दिलगिरी व्यक्त केली आहे. पण सध्याचा काळ हा परीक्षा घेण्यासाठी योग्य नाही. कारण एक तांत्रिक अडचण आल्यास परीक्षेच्या निवड प्रक्रियेमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण होऊ शकतो. महाविकास आघाडी सरकारतर्फे राबवली जाणारी ही पहिलीच भरती प्रक्रियेची परीक्षा होती. पारदर्शी पद्धतीने ती पार पाडण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणे हे महाविकास आघाडीचे प्रमुख धोरण आहे. त्यामुळे हा निर्णय मुलांच्या भविष्यासाठी घेण्यात आला आहे, असेही पटेल यांनी आपल्या स्पष्टीकरणात सांगितले आहे.

Satej Patil told reason why kirit somaiya was banned in kolhapur district

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*