सर्वजण मिळून भीषण पूरपरिस्थितीवर मात करूया सतेज पाटील यांचे आवाहन


कोल्हापूर: “पूरपरिस्थितीला सामोरं जाणं हे एकट्या- दुकट्याचं काम नाही, आपण सर्वजण मिळून या भीषण संकटावर मात करुया!”, अशा शब्दांत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील स्थलांतरित पुरग्रस्तांना धीर दिला.Satej Patil’s visited to the camp for flood victims in Shirol Taluka

शिरोळ तालुक्यातील पुरग्रस्त व जनावरांचे प्रशासनाच्या वतीने गुरुदत्त साखर कारखान्याच्या छावणीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. या छावणीला पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट दिली व पुरग्रस्तांशी संवाद साधला तसेच त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.



यावेळी कारखान्याचे संचालक बबन चौगुले, संजय गायकवाड, विकास चौगले, पंचायत समिती सभापती दीपाली परीट, सैनिक टाकळीच्या सरपंच हर्षदा पाटील, नवे दानवाड च्या सरपंच वंदना कांबळे यांच्यासह पदाधिकारी, सरपंच, सैनिक टाकळीच्या स्वराज्य करिअर अकॅडमीच्या वतीने मदतकार्य करणारे विनोद पाटील, मंडल अधिकारी विनायक माने, आरोग्य अधिकारी, स्थलांतरित पूरग्रस्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

  • सर्वजण मिळून भीषण पूर परिस्थितीवर मात करूया
  • शिरोळ तालुक्यातील स्थलांतरित पुरग्रस्तांना धीर
  • पालकमंत्री सतेज पाटील यांची छावणीला भेट
  • स्थलांतरित पुरग्रस्तांसाठी एसडीआरएफमधून निधी
  • जनावरांना चारा पुरवण्याचे कारखान्यांना आवाहन
  • 15 ऑगस्टपर्यंत छावणीत राहाण्याचे स्थलांतरितांना आवाहन
  • सध्या मदतकार्यावर भर, पूर ओसरल्यावर नुकसानीचे पंचनामे

Satej Patil’s visited to the camp for flood victims in Shirol Taluka

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात