Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांना आता ASL श्रेणीची सुरक्षा!

Mohan Bhagwat

मोहन भागवत यांना यापूर्वी झेड प्लस सुरक्षा होती


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत (  Mohan Bhagwat ) यांची सुरक्षा आता कडक करण्यात आली आहे. आरएसएस प्रमुखांचा सुरक्षा प्रोटोकॉल झेड-प्लस करण्यात आला आहे. याचा अर्थ आता त्यांना तेच सुरक्षा कवच मिळणार आहे जे देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शाह यांना मिळाले. प्राप्त माहितीनुसार, कोणत्याही संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.



ASL चे सुरक्षा वर्तुळ अतिशय सुरक्षित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता ते फक्त खास तयार केलेल्या हेलिकॉप्टरने कुठेही जाऊ शकतील. त्यांच्या दौऱ्यापूर्वी त्या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेचा काटेकोर आढावा घेतला जाणार असून, तालीमही केली जाणार आहे. या सुरक्षेमध्ये जिल्हा प्रशासन, पोलिस आणि आरोग्य विभागासह स्थानिक संस्था नवीन प्रोटोकॉल अंतर्गत तैनात आहेत. नवीन सुरक्षा मिळाल्यानंतर जुने सुरक्षा पथक मोहन भागवत ज्या ठिकाणी भेट देतील तेथे आधीच हजर राहणार आहे. त्यांच्या ग्रीन सिग्नलनंतरच मोहन भागवत त्या ठिकाणी जातील.

आता सरसंघचालकांना मिळालेले सुरक्षा कवच अॅडव्हान्स सिक्युरिटी लायजन (एएसएल) असे आहे. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. पुनरावलोकनाच्या आधारे, आरएसएसचे सुरक्षा वर्तुळ आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. टाइम्स ऑफ इंडियाने गृह मंत्रालयाच्या सूत्रांना सांगितले की, हा निर्णय दोन आठवड्यांपूर्वीच अंतिम करण्यात आला होता. मोहन भागवत यांना यापूर्वी झेड प्लस सुरक्षा होती ज्यात सीआयएसएफचे अधिकारी आणि रक्षक यांचा समावेश होता.

Sarsangchalak Mohan Bhagwat now ASL category security

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात