शंभर कोटी वसुलीप्रकरणी ईडीने ताब्यात घेतलेले संजीव पलांडे आहेत कॉँग्रेसच्या माजी आमदाराचे चिरंजीव, आर. आर. पाटील यांचेही होते स्वीय सहाय्यक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी त्यांचे तत्कालिन स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांनाही सक्तवसुली संचालनालयाने ताब्यात घेतले आहे. पलांडे हे कॉँग्रेसचे शिरूर तालुक्यातील माजी आमदार काका पलांडे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केले आहे. Sanjeev Palande, who was arrested by the ED in connection with the recovery of Rs 100 crore, is a son of former Congress MLA., was a personal assistant of R.R.Patil


विशेष प्रतिनिधी

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी त्यांचे तत्कालिन स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांनाही सक्तवसुली संचालनालयाने ताब्यात घेतले आहे. पलांडे हे कॉँग्रेसचे शिरूर तालुक्यातील माजी आमदार काका पलांडे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉँब टाकला होता. यामध्ये त्यांनी अटकेत असलेला निलंबित सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे याला देशमुख यांनी मुंबईतील बारवाल्यांकडून दर महिन्याला शंभर कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते. वाझेच्यागृहमंत्र्यांच्या बंगल्यातील भेटीवेळी त्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि अन्य एक, दोन स्टाफ असल्याचे परमबीर सिंग यांनी म्हटले होते. त्यामुळे संजीव पलांडे हे देखील ईडीच्या रडारवर आले आहेत.

संजीव पलांडे हे उपजिल्हाधिकारी म्हणून शासनाच्या सेवेत दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी पुणे, सोलापूर जिल्ह्यात विविध पदांवर काम केले. आर. आर. पाटील हे राज्याचे गृहमंत्री असताना त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले होते. त्यानंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक होते. पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते.
राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी निकटचे संबंध आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन अनिल देशमुख यांची गृहमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावरच लगेचच त्यांच्या स्वीय सहाय्यकपदी पलांडे यांची नेमणूक झाली.

दरम्यान, माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) शुक्रवारी (२५ जून २०२१ रोजी) सकाळी छापा टाकला आहे. ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवतीर्यांच्या घरांवर छापे टाकलेत.

देशमुख यांनी महिना १०० कोटी रुपयांचा हप्ता किंवा खंडणी गोळा करण्याची सूचना निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंसह अन्य अधिकाऱ्यांना दिली होती. तसेच पोलीस अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया, नियमित कामकाजातही देशमुख यांचा हस्तक्षेप वाढला होता, असे आरोप करणारे पत्र मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मे महिन्याच्या सुरुवातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते.

या तक्रारीची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात केली होती. त्यावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करून दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. सीबीआयच्या पथकाने प्राथमिक चौकशी अहवाल दिल्ली येथील मुख्यालयास पाठवला. त्यात देशमुख यांनी पद, अधिकारांचा गैरवापर केला, अप्रामाणिकपणे कर्तव्य बजावत गैरफायदा घेतला, असे निरीक्षण नमूद होते. देशमुख यांची कृती दखलपात्र गुन्हा नोंद होण्यास पात्र ठरते, असे निरीक्षण त्यात नमूद होते. त्याआधारे सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

Sanjeev Palande, who was arrested by the ED in connection with the recovery of Rs 100 crore, is a son of former Congress MLA., was a personal assistant of R.R.Patil

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात