विशेष प्रतिनिधी
नागपूर : शिवसेनेचे फायरब्रॅँड नेते म्हणून ओळखले जाणाऱ्या खासदार संजय राऊत यांचा आवाज चोरीच्या उर्जेवर पोहोचविण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली. चक्क आकडा टाकून सभेसाठी वीज घेण्यात आली होती. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर महावितरणने वीजचोरीची तक्रार दाखल करत कारवाई केली आहे.Sanjay Raut’s voice on the energy from theft
दक्षिण नागपुरातील गजानन मंदिर चौकात संजय राऊत यांची सभा झाली. सभामंडपाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या दोन खांबावरील विजेच्या तारेवर आकडे टाकून वीजपुरवठा घेण्यात आला होता. याचे कुणीतरी व्हिडिओह्णचित्रण करून व्हायरल केले. महावितरणने याची गंभीरतेने दखल घेत विद्युत कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा नोंदविला.
महावितरणच्या सुभेदार सेक्शनच्या उपकार्यकारी अधिकाऱ्यांनी जानकी नगर डीसीच्या सहायक अभियंत्यांच्या तक्रारीवर बिरजू नावाच्या डेकोरेशन संचालकावर ३ हजार ४९७ रुपयांचा दंड लावला आहे. दंड भरल्यामुळे पोलीस तक्रार करण्यात आली नाही, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.असा प्रकार कानावर आला आहे. कसा झाला व कुणी केला याची आम्ही पक्षांतर्गत चौकशी करू, असे राऊत यांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App