विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुटुंबातील पाच जणांची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सर्व लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराजच्या थरवाई येथील खैवाजपूर गावात एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. यामध्ये दाम्पत्यासह त्यांची सून आणि 2 वर्षांची नात यांचा समावेश आहे. सर्वांवर धारदार शस्त्रांनी वार करून जीवे मारण्यात आले. Five members of the same family killed in Prayagraj
गुन्हा केल्यानंतर मारेकऱ्यांनी घरातील एका खोलीला आग लावली होती. सकाळी घरातून धूर निघत असल्याचे पाहून लोकांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. मृतांमध्ये रामकुमार यादव (५५), त्यांची पत्नी कुसुम देवी (५२), मुलगी मनीषा (२५), सून सविता (२७) आणि नात मीनाक्षी (२) यांचा समावेश आहे.
तर दुसरी नात साक्षी (५) जिवंत सापडली आहे. ही हत्या कोणी व का केली याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. पोलीस अधिकारी घटनास्थळी असून तपास सुरू आहे.
यापूर्वी १६ एप्रिल रोजी प्रीती तिवारी (३८) आणि तिच्या तीन मुली माही (१२), पिहू (८) आणि कुहू (३) यांची प्रयागराजमधील नवाबगंज येथील खगलपूर गावात गळा चिरून हत्या करण्यात आली होती, तर पती राहुल तिवारी (४२) लटकलेल्या अवस्थेत आढळला. घरामध्ये सर्वांचे मृतदेह पडलेले आढळून आले. घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली असून, त्यामध्ये या घटनेसाठी सासरच्या मंडळींना जबाबदार धरण्यात आले आहे.
राहुल हा मूळ कौशांबीच्या भादवा गावचा. सुमारे अडीच महिन्यांपासून तो पत्नी आणि मुलींसोबत खगलपूर येथे भाड्याच्या घरात राहत होता. १६ एप्रिल रोजी सकाळी बराच वेळ कुटुंब न दिसल्याने शेजाऱ्यांनी फोन केला असता त्यांना राहुल अंगणात लटकलेला दिसला.
आवाज ऐकून ग्रामस्थ जमा झाले आणि त्यांनी आत जाऊन पाहिले असता खोलीत प्रीती व तिन्ही मुलींचे रक्ताळलेले मृतदेह पडले होते. तपासात प्रीती आणि तिन्ही मुलांचा गळा चिरून खून केल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान पोलिसांना घरातूनच दोन पानी सुसाईड नोट सापडली. यामध्ये सासरच्या एकूण ११ जणांची नावे लिहिली असून, त्यांच्यावर छळ केल्याचा आरोप आहे. या लोकांच्या त्रासाला कंटाळूनच मी हे पाऊल उचलत असल्याचेही लिहिले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App