संजय राऊत यांच्या नांदगाव मेळाव्याने पंकज यांच्याच भुजात बळ येणार, तर शिवसेना उबाठाच्या हाती काय लागणार?

विशेष प्रतिनिधी

नाशिक : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे आज 3 डिसेंबर 2022 रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये आल्यावर लगेच संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडून येणार नाहीत. त्यांचे डिपॉझिट वाचले तरी खूप आहे, असे शरसंधान साधले आहे. पण त्याच वेळी संजय राऊत ते नांदगावला मेळावे घेण्यासाठी जाणार आहेत. Sanjay Raut’s rally in nandgaon constituency will bring cheers to NCP Chagan Bhujbal and Pankaj Bhujbal, but what Shivsena will get from it??

नांदगाव विधानसभा मतदारसंघात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सुहास कांदे हे आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उठावाच्या वेळी सुहास कांदे अतिशय आक्रमक झाले होते. ते दररोज माध्यमांमध्ये झळकत होते. सुहास कांदे यांचे वैशिष्ट्य असे की त्यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र आणि त्यावेळचे राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ यांचा पराभव केला आहे. याचा अर्थ संजय राऊत यांचा मेळावा जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासाठी असला, तरी तो आमदार सुहास कांदे आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या लढतीसाठी प्रसिद्ध झालेल्या नांदगाव मतदारसंघात आहे.



नांदगाव विधानसभा मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीच्या काळात शिवसेनेकडे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या काळात राष्ट्रवादीकडे कायम राहिला आहे. परंतु 2019 नंतर समीकरणे बदलल्याने संजय राऊत आणि छगन भुजबळ हे एका आघाडीत म्हणजे महाविकास आघाडीत आले आणि सध्या तरी हे दोन्ही नेते महाविकास आघाडीतच आहेत. पण नांदगाव मध्ये आमदार मात्र त्यावेळच्या अखंड शिवसेनेचा आणि आता बाळासाहेबांच्या शिवसेनेचा असल्याने तिथे खरी राजकीय चुरस निर्माण झाली आहे.

संजय राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी मेळावा घेणार असले तरी नांदगाव मतदार संघावर खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंकज भुजबळ यांचा दावा आहे. मग संजय राऊत हे पंकज भुजबळ यांच्यासाठी मेळावा घेणार आहेत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातले संभाव्य कोणत्या उमेदवारासाठी मेळावा घेणार आहेत??, असा प्रश्न तयार झाला आहे. राऊत आणि भुजबळ यांचे टार्गेट सुहास कांदेंच्या रूपाने समान आहे. पण ज्या नांदगाव मतदार संघावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावाच उरलेला नाही, त्या मतदारसंघात मेळावा घेऊन संजय राऊत हे पंकज यांच्या भुजात बळ आणणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि राऊतांच्या मेळाव्याने पंकज यांच्याच भुजात बळ येणार असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हाती काय लागणार आहे??, हा प्रश्न तयार झाला आहे.

Sanjay Raut’s rally in nandgaon constituency will bring cheers to NCP Chagan Bhujbal and Pankaj Bhujbal, but what Shivsena will get from it??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात