प्रतिनिधी
मुंबई : माझ्याच लोकांनी मला दगा दिला. त्याचे वाईट वाटते, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सगळी निरवा निरव करून आज सगळ्यांचा निरोप घेऊन मंत्रालयातून बाहेर पडले. त्यांच्या या वक्तव्याला संजय राऊत यांनी इमोशनल तडका देत, माझे मन हेलावले, असे सांगितले. Sanjay Raut’s makes it emotional, the statement by Uddhav Thackeray that his own people betrayed him
उद्धव ठाकरे यांनी आज अखेरची मंत्रिमंडळ बैठक घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांचे आभार मानले. मला कोणताही अनुभव नसताना आपण मला सांभाळून घेतले. मंत्र्यांनी आणि प्रशासनाने मला सहकार्य केले पण माझ्याच लोकांनी मला दगा दिल्यामुळे वाईट वाटते. पण यापुढे देखील आपण एकत्र सहकार्याने काम करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी देखील दुजोरा दिला. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला संजय राऊत यांनी इमोशनल तडका दिला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना धाकट्या भावाप्रमाणे मुलाप्रमाणे वागवले सगळ्यांना प्रेम दिले. पण त्यांच्या सहकाऱ्यांनी दगा दिल्याचे त्यांचे वक्तव्य वक्तव्य मन हे लावणारे आहे, असे ते म्हणाले.
Sanjay Raut : राज ठाकरे पुन्हा म्हणाले, “लवंडे”; फडणवीस म्हणाले, “बिनकामाचे”!!
एवढे करूनही संजय राऊत यांनी आपल्या जुन्याच वक्तव्याची री ओढली. बंडखोर आमदारांपैकी अजूनही 15 – 20 आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या थेट संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.
पण उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातून बाहेर पडताना मात्र सगळी निरवा निरव करून बाहेर पडत असल्याचे त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून दिसून आले. या बॉडी लॅंग्वेज बदल मात्र संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे मंत्री चकार शब्द बोलले नाहीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App