ईडी कोठडीत व्हेंटिलेशन नसल्याची संजय राऊतांची तक्रार; पण राऊतांच्या एसी ईडी कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ!!


वृत्तसंस्था

मुंबई : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचा घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांची ईडीची कोठडी आज 4 ऑगस्ट 2022 रोजी संपली. त्यामुळे त्यांना आज सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने कोर्टात पेश केले. त्यावेळी संजय राऊत यांनी ईडीच्या कोठडीत व्हेंटिलेशन नसल्याची तक्रार केली. त्या तक्रारीचे दखल घेत कोर्टाने त्यांना योग्य त्या व्हेंटिलेशन असलेल्या कोठडीत ठेवण्याचे आदेश ईडीला दिले आणि संजय राऊत यांची कोठडीची मुदत 8 ऑगस्टपर्यंत वाढवली. Sanjay Raut’s complaint that there is no ventilation in the ED cell

वर्षा राऊत यांच्या खात्यात पैसे

संजय राऊत, त्यांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यात पत्राचाळ घोटाळ्यातील मुख्य आरोपी प्रवीण राऊत यांच्या खात्यातून 1.30 लाख रुपये कसे आले?, याचा तपास आणि चौकशी करायची आहे. प्रवीण राऊत यांच्या पैशावर संजय राऊत यांनी परदेश वाऱ्या कशा केल्या?, याची चौकशी करायची आहे. त्यामुळे त्यांना ईडी कोठडीत ठेवण्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी कोर्टात केली.राऊतांची तक्रार, मात्र एसी कोठडी

मात्र त्याआधीच संजय राऊत यांनी ईडी कोठडीत व्हेंटिलेशन नसल्याची तक्रार केली. आपल्याला हृदयविकाराचा त्रास आहे. श्वास घेतानाही त्रास होतो. पण ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला व्हेंटिलेशन नसलेल्या कोठडीत ठेवले आहे. तेथे हवा येण्यासाठी खिडकी देखील नाही. व्हेंटिलेशनची पुरेशी सोय नाही, असे संजय राऊत यांनी तक्रारीत नमूद केले.

एसी कोठडीत ठेवणार

त्यावर कोर्टाने ईडीच्या वकिलांना या संदर्भात विचारणा केल्यानंतर संजय राऊत यांना ज्या कोठडीत ठेवले आहे, तिथे एसी आहे, असे स्पष्ट केले. राऊत यांना यापुढे देखील एसी कोठडीत ठेवू, अशी कबुली देखील ईडीच्या वकिलांनी दिली आहे.

पत्राचाळ घोटाळ्याची व्याप्ती, संजय राऊत प्रवीण राऊत आणि वर्षा राऊत यांच्यातील व्यवहार हे लक्षात घेऊन कोर्टाने संजय राऊत यांच्या कोठडीत आणखी 4 दिवसांची वाढ करून 8 ऑगस्ट 2022 पर्यंत त्यांना ईडी कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Sanjay Raut’s complaint that there is no ventilation in the ED cell

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*