प्रतिनिधी
मुंबई : गोरेगाव मधील भूखंडाचा एफएसआय फसवून विकण्यात आल्या प्रकरणी बांधकाम व्यवसायिक प्रवीण राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने अटक केली आहे. तब्बल १०३४ रुपयांचा हा घोटाळा आहे. या घोटाळ्यात याच प्रवीण राऊत यांना अटक केल्याची माहिती आहे.Sanjay Raut’s close aide Praveen Raut arrested by ED
प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी 55 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे समोर आले होते. त्यावेळी ईडीने वर्षा राऊत यांची चौकशी केली होती.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गोरेगावमधील एका भूखंडाच्या फसव्या एफएसआय (फ्लोअर स्पेस इंडेक्स) विक्रीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केल्यानंतर बुधवारी पहाटे प्रवीण राऊत यांना अटक केली. प्रवीण राऊत हे एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत. यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये पीएमसी बँक घोटाळात प्रवीण यांचे नाव समोर आले होते. प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी २०१० मध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे यंत्रणेच्या तपासात समोर आले होते. ज्याचा वापर मुंबईतील दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला गेला होता.
एचडीआयएलमधील १०३४ कोटींचा घोटाळा समोर आल्यानंतर आता प्रवीण राऊत यांना अटक केेली आहे. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या खात्यामधून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले होते आणि याचे पुरावे ईडीला मिळाले होते. त्यामुळे ईडीकडून अद्याप याप्रकरणी तपास सुरु आहे.
प्रवीण राऊत यांना मुंबईपासून जवळ असलेल्या फलघर जिल्ह्यातील सफाळे येथे रिअल इस्टेटमध्ये मोठा व्यवसाय आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रवीण यांच्या घराची झडती घेतली आणि त्यांना दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील झोन कार्यालयात चौकशीसाठी आणले. प्रवीण यांनी तपासात सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर ईडीने अनेक तासांच्या चौकशीनंतर अटक केली.
हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (डीचआयएल) ची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शनला म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने एफएसआय फसवणूक करण्यात मदत केल्याबद्दल ईडी प्रवीण राऊत यांची चौकशी करत आहे. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर येथील पत्रा चाळीचा काही वर्षांपूर्वी गुरुआशिष कन्स्ट्रक्शनने पुनर्विकास करण्याचे काम मिळाले होते. पण काही वर्षांपूर्वी चाळीतील रहिवाशांसाठी सदनिका न बांधता १,००० कोटी रुपयांचा एफएसआय फसवणूक करून विकला होता.
फसव्या एफएसआय व्यवहारासाठी प्रवीण हे गुरुआशिष कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी आणि एचडीआयएलच्या संपर्कात होते. प्रवीण यांनी एचडीआयएलच्या प्रवर्तकांना मनी लॉन्ड्रिंगमध्येही मदत केली. गेल्या वर्षी, ईडीने संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांची प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरीसोबतच्या भागीदारीबाबत चौकशी केली होती.
प्रवीण राऊत यांनी माधुरी यांनी १.६ कोटी रुपये दिले होते. या रकमेपैकी माधुरी राऊत यांनी वर्षा राऊत यांना ५५ लाख रुपये व्याजमुक्त कर्ज म्हणून हस्तांतरित केले. ही रक्कम दादर (पूर्व) येथे फ्लॅट खरेदीसाठी वापरण्यात आली. वर्षा आणि माधुरी या अवनी कन्स्ट्रक्शनमध्ये भागीदार असल्याचे तपासात पुढे आले आहे. यापूर्वी वर्षा यांनी ईडीला सांगितले की, त्यांनी माधुरी राऊत यांचे ५५ लाखांचे कर्ज फेडले आहे. २०२० मध्ये, ईडीने या प्रकरणात प्रवीण राऊत यांची ७२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App