प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील सरकार बेकायदा आहे. या सरकारचे आदेश मानू नका, अशी सरकारच्या विरोधात चिथावणी देणे तसेच पोलिसांची प्रतिमा समाजामध्ये खराब करणे या कारणांमुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Sanjay Raut was accused of inciting the police-administration against the government
विद्यमान राज्य सरकार बेकायदेशीर असून आगामी तीन महिन्यांत हे सरकार कोसळणार आहे. त्यामुळे पोलिसांसह इतर अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर सरकारच्या आदेशाचे पालन करू नका. बेकायदेशीर आदेशाचे पालन केले तर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील, अशी धमकी देखील संजय राऊत यांनी दिली होती. याच धमकीवरून त्यांच्याविरोधात नाशिक येथील मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी, १२ मे रोजी राऊत नाशिक दौऱ्यावर होते. शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. राज्यातील सरकार हे अपात्र आमदारांच्या भरवशावर असल्याने ते बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने ते बेकायदेशीरच ठरवले आहेत. त्यामुळे अशा घटनाबाह्य आणि बेकादेशीर सरकारच्या आदेशांचे पालन करू नये, असे आवाहन केले होते.
त्या अनुषंगाने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सरकारबद्दल अप्रिय बोलल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात भादंवि ५०५ (१)(ब) कलमा अंतर्गत पोलिसांनी विषयी अप्रतिची भावना निर्माण करणे, चिथावणी देणे या अंतर्गत पोलीस हवालदार केदार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App