विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिक मधल्या काठे गल्ली परिसरातील सातपीर नावाच्या अनधिकृत दर्ग्यावर पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करून तो दर्गा काढून टाकला. परंतु, संजय राऊतांना ही कायदेशीर कारवाई टोचली असून शिवसेनेच्या शिबिरात अडथळा आणण्यासाठीच फडणवीस सरकारने नाशिक मधल्या दुर्गे आणि मशिदींवर कारवाई सुरू केल्याचे अजब तर्क संजय राऊत यांनी लढवले.
काठे गल्लीतल्या सातपीर दर्ग्याला तो अनधिकृत असल्याची नोटीस नाशिक महापालिका आणि पोलिसांनी पूर्वीच दिली होती. तो दर्गा हटविण्यासाठी १५ दिवसांची मुदत देखील दिली होती. मुस्लिम समाजाने आणि धर्मगुरूंनी सातपीर अनधिकृत दर्गा हटवला नाही. उलट दर्गा समर्थकांनी काल मध्यरात्रीनंतर पोलिसांवरच तुफान दगडफेक केली. त्यामध्ये 31 पोलीस जखमी झाले. परंतु पोलीस तिथून हटले नाहीत. पोलीस आणि नाशिक महापालिका प्रशासनाने कठोर कायदेशीर कारवाई करून अनधिकृत सातपीर दर्गा तिथून हटवलाच.
परंतु या कारवाईवरूनच संजय राऊत यांनी अजब तर्कट लढवत आजच्या नाशिक मधल्या शिवसेनेच्या शिबिराला अडथळा आणण्यासाठीच फडणवीस सरकारने दर्गा आणि मशिदी यांच्यावर कारवाई सुरू केल्याचा आरोप केला. शिवसेनेला संपवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला पण शिवसेना संपली नाही आणि संपणार नाही अशी गर्जनाही संजय राऊत यांनी केली. पण पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या जमावाचे अप्रत्यक्ष समर्थन करून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची फितरत दाखवून दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App