9750 प्रशिक्षणार्थ्यांना इलेक्ट्रिशियन व अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व इंडस्ट्रियल ऑटोमेशनचे प्रशिक्षण!
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Visionary MoU मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय, येथे महाराष्ट्र शासन आणि ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्ट (SSRDPT) बंगळुरु आणि स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन, बंगळुरु यांच्यामध्ये युवकांना नवीन तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.Visionary MoU
या कराराच्या माध्यमातून स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाऊंडेशन या संस्थेतर्फे पुढील 3 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यातील 20 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून इलेक्ट्रिशियन या व्यवसायाच्या कार्यशाळांची दर्जा वृद्धी करण्यात येणार आहे. यासोबतच सोलार टेक्निशियन लॅब व इंडस्ट्रियल ऑटोमेशन लॅब उभारून देण्यात येणार आहे. स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाऊंडेशनतर्फे राज्यातील वीजतंत्री व्यवसायाच्या सर्व शिल्प प्रदेशांना बंगळुरु येथे आधुनिक तंत्रज्ञान व सॉफ्ट स्किल्सचे 15 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या कराराच्या माध्यमातून राज्यातील मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नाशिक इत्यादी विभागांतील 20 शासकीय ITI केंद्रांची निवड करण्यात आलेली आहे. या प्रकल्पाअंतर्गत 2025-26 पासून पुढील 4 वर्षात प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या वर्षात 10 केंद्रांमध्ये 1500 युवकांना, दुसऱ्या वर्षात 15 केंद्रांमध्ये 2250 युवकांना, तिसऱ्या वर्षात 20 केंद्रांमध्ये 3000 आणि चौथ्या वर्षात देखील 3000 युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सामंजस्य करारामुळे टप्प्याटप्प्याने 9750 प्रशिक्षणार्थ्यांना इलेक्ट्रिशियन व अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व इंडस्ट्रियल ऑटोमेशन या विषयातील प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगल प्रभात लोढा, श्री. श्री. ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्टचे विश्वस्त विजय हाके, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाऊंडेशनच्या सीएसआर प्रमुख रिचा गौतम व उपाध्यक्षा दामिनी चौधरी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App