Sanjay Raut : शिवसेना आता ट्रिपल डिजिट साठी बसली अडून; राऊतांच्या पत्रकार परिषदेतून सेंच्युरीचे संकेत!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना आणि काँग्रेसचे भांडण झाल्यानंतर सुरुवातीला वाटाघाटींच्या बैठकीला नाना पटोले नकोत या मुद्द्यावर शिवसेना अडून राहिली. उद्धव ठाकरेंचा तो हक्क काँग्रेसने पुरवला आणि बाळासाहेब थोरात यांना मातोश्रीवर पाठविले, पण आता त्या पलीकडे जाऊन शिवसेना जागावाटपात ट्रिपल डिजिट साठी अडून राहिल्याचे उघड झाले. शिवसेनेने सेंच्युरी मारावी, अशी महाराष्ट्रातल्या सगळ्यांचीच अपेक्षा असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत करून तसेच संकेत दिले.  Sanjay Raut says Shiv Sena to hit a century

महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसने ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना डबल डिजिट वर ढकलून स्वतःकडे ट्रिपल डिजिट म्हणजे 105 ते 110 जागा खेचून घेतल्याच्या बातम्या माध्यमांनी चालविल्या. ठाकरेंच्या वाट्याला 90 ते 95 आणि पवारांच्या वाट्याला 75 ते 80 जागा येणार असल्याचे त्या बातम्यांमध्ये नमूद केले.

या मुद्द्यावरूनच आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना शिवसेना 100 जागा लढणार का??, असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर शिवसेनेने सेंच्युरी मारावी, अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे, फक्त उमेदवार यादीतच नव्हे, तर निवडून येण्यात देखील शिवसेना सेंच्युरी मारेल, असे उत्तर राऊत यांनी दिले. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या जागावाटपात शिवसेना आता ट्रिपल डिजिट जागांवर अडून बसल्याचे उघड झाले.

पवारांना ट्रिपल डिजिट जागा कोण देणार??

शरद पवारांची राष्ट्रवादी ट्रिपल डिजिट वर अडून बसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण लोकसभेतल्या परफॉर्मन्सच्या आधारे त्यांना तेवढ्या जागा शिवसेना किंवा काँग्रेस देणार नाहीत. याची पवारांना जाणीव असल्याने पवारांनीच ट्रिपल डिजिट जागा लढवण्यासाठी मागण्या ऐवजी स्ट्राईक रेट वर भर देत मिळतील तेवढ्याच जागा पदरात पाडून घेण्याचे “सुप्त” धोरण ठेवले आहे.

Sanjay Raut says Shiv Sena to hit a century

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात