विशेष प्रतिनिधी
मुंबई – भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांमुळे वातावरण खराब होत आहे. मूळ भाजपचे सदस्य असलेल्यांकडून कोणतीही बेताल वक्तव्ये केली जात नाहीत, असे सांगत भाजप आणि शिवसेनेतील हिंदुत्वाचा धागा कायम असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नमूद केले. Sanjay Raut praises BJP leaders
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार आदींकडून कधीही बेताल वक्तव्ये केली जात नाहीत. हे सर्व भाजपचे जुनेजाणते नेते आहेत; परंतु बाहेरून आलेल्यांमुळे भाजपमधील वातावरण खराब केले जात आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजप राजकीयदृष्ट्या वेगळे झाले असले, तरीही दोन्ही पक्षांतील हिंदुत्वाचा धागा कायम असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणानंतर राज्यात शिवसेना विरुद्ध राणे असा वाद पुन्हा नव्याने सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत यांनी थेट भाजपवर हल्ला न चढवता भाजपमध्ये नव्याने आलेल्यांना लक्ष्य केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App