शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या 71व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी भारतीय जनता पक्षाला (भाजप) नवीन उंचीवर नेले. त्यांच्या तोडीचा कोणताही नेता नाही. Sanjay Raut lauds PM Modi leadership, says no one can match him
वृत्तसंस्था
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या 71व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी भारतीय जनता पक्षाला (भाजप) नवीन उंचीवर नेले. त्यांच्या तोडीचा कोणताही नेता नाही.
राऊत म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील जनतेत प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर भाजपला नवीन उंचीवर नेले आहे. पंतप्रधान मोदींच्या राजवटीने देशात राजकीय स्थिरता आणली आहे,” राऊत शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते.
“पीएम मोदींच्या कार्यशैलीबद्दलच्या दृष्टिकोनात फरक असू शकतो, परंतु आम्हाला हे सत्य मान्य करावे लागेल की, फक्त एक मोदीजीच आहेत आणि त्यांच्यासारखे कोणीही नसेल.”
भाजपतर्फे पंतप्रधान मोदींच्या 71व्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. नरेंद्र मोदी “सेवा समर्पण दिन’ सुरू करण्यात आला. हे अभियान 17 सप्टेंबरला सुरू झाले असून 7 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदशी संबंधित प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त करताना राऊत म्हणाले, “सूदची नियुक्ती झाल्यानंतर आयटी छापे टाकण्यात आल्याचे मी पाहिले आहे. दिल्ली सरकारच्या एका शैक्षणिक कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून त्याच्या नियुक्तीनंतर छापे टाकण्यात आले. ही एक गंभीर बाब आहे.”
“जर कोणी लोकांच्या हितासाठी इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात सामील झाला तर तो तुमचा शत्रू बनतो का? असा सवालही त्यांनी केला. प्राप्तिकर विभागाने बुधवारी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App