विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माजी शिंदे पुरस्कार देऊन सन्मान केला, पण याच शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना 2019 मध्ये मुख्यमंत्री होऊ दिले नाही, अशा परखड शब्दांमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची पोलखोल केली.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, तर शिवसेना फुटली नसती, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. तो संजय राऊत यांनी 2019 सगळ्या घटनाक्रम सांगून खोडून काढला. 2019 मध्ये भाजपने शब्द पाळला नाही. त्यांनी अडीच – अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता. त्यावरून ते मागे हटले, अन्यथा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले होते. महाविकास आघाडीत शरद पवार आणि अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध केला होता.
उद्धव ठाकरे सोडून दुसरे कोणी मुख्यमंत्री झाले, तर महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही, असा दावा शरद पवारांनी केला होता म्हणून एकनाथ शिंदे 2019 मध्ये मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. त्यांचा आता सत्कार करणारेच त्यावेळी त्यांचे मुख्यमंत्री पदाच्या विरोधात होते, अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी शरद पवारांच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल केली.
या संदर्भात 2019 चा नेमका घटनाक्रम लक्षात घेतला, तर अखंड राष्ट्रवादीत असताना अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्यासारख्या “ज्युनियर” नेत्याच्या नेतृत्वाखाली म्हणजेच मुख्यमंत्रीपदा खाली काम करायला तयार नव्हते. शरद पवारांनी त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला होता. उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद मान्य करण्याचा निर्णय शरद पवारांनी काँग्रेस हायकमांडच्या गळी उतरवला होता. त्यानुसार उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले होते.
पण 2024 नंतरच्या नव्या घटनाक्रमात एकनाथ शिंदे – शरद पवार यांच्या नव्या “राजकीय हनिमून” विषयी संजय राऊत यांनी पुन्हा प्रहार करून पवारांचे दुटप्पी राजकारण एक्सपोज केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App