विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या काका – पुतण्यांच्या “सॉफ्ट” भांडणात संजय राऊत ( Sanjay raut )यांनी सोडला, गुलाबी सरडा पण तोच उलटून त्यांना साप “चावला”!! पण संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे काका पुतण्या मधले सॉफ्ट भांडण महाराष्ट्रासमोर एक्सपोज झाले!!
महाविकास आघाडीच्या शिवसेना पुरस्कृत आजच्या मेळाव्यात संजय राऊत यांनी अजित पवारांवर गुलाबी सरडा म्हणून टीका केली. यावेळी स्वतः शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे व्यासपीठावर उपस्थित होत्या त्यांच्यासमोरच संजय राऊत यांनी अजित पवारांना “गुलाबी सरडा” म्हणून त्यांच्यावर शरसंधान साधले.
अजित पवार गेल्या दोन-तीन दिवसांपासून शरद पवारांवर टीका करत नाहीत. ते पवारांविषयी खूप “सॉफ्ट” झाले आहेत. ए एन आय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तर अजित पवारांनी राष्ट्रवादीतल्या फुटीबद्दल देखील “नो कॉमेंट्स” एवढेच उत्तर देऊन पवारांवर टीका करणे टाळले.
या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांची अजित पवारांवरची टीका शरद पवारांच्याच एका नातवाला आवडली नाही. पवारांचे बारामतीतले “इच्छुक” नातू युगेंद्र पवार यांनी संजय राऊत यांच्या टीकेचा सौम्य निषेध केला. काही झालं तरी ते माझे काका आहेत. त्यांना सरडा म्हणणे योग्य नाही, असे युगेंद्र पवार म्हणाले. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांचे चिरंजीव आहेत.
पण संजय राऊत यांच्या या टीकेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खवळला. संजय राऊत हे दुतोंडी साप आहेत, अशी टीका अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून सुरू झाली. पण काही झाले तरी संजय राऊत यांच्या गुलाबी सरडा या वक्तव्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतले “सॉफ्ट” भांडण महाराष्ट्र समोर एक्स्पोज झाले. कारण अजित पवारांना शरद पवारांवरची कोणी केलेली टीका चालत नाही आणि आता अजित पवारांवर केलेली संजय राऊत यांची टीका युगेंद्र पवार आणि अजित पवारांच्याही राष्ट्रवादीला चालली नाही. संजय राऊत यांनी वर्मी घाव घातल्याबरोबर दोन्ही राष्ट्रवादीचे नेते त्यांच्यावरच तुटून पडले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App