प्रतिनिधी
पुणे : बृहन्मुंबईच्या पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांची पुण्याचे सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस उपमहानिरीक्षक पदाच्या दर्जावरुन विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या पदावर पदोन्नती देण्याकरीताच्या प्रक्रियेतुन कर्णिक यांना पदोन्नती देण्यात आली आहे. Sandeep Karnik is the new Joint Commissioner of Police of Pune
तर विद्यमान सहपोलिस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांची मुंबईच्या महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. गृह विभागाचे सहसचिव वेंकटेश भट यांनी याबाबतचे आदेश बुधवारी जारी केले.
संदीप कर्णिक पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक असताना मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता.. या संपूर्ण घटनेची तेव्हा राज्यभरात चर्चा झाली होती.त्यानंतर संदीप कर्णिक यांची तातडीने बदली करण्यात आली होती. राज्याचे माजी पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांचे ते जावई आहे.
कृष्ण प्रकाश यांची ही बदली
मुंबईचे विशेष सुधार सेवेचे पोलीस महासंचालक अंकुश शिंदे यांची पिंपरी-चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर पिंपरी-चिंचवडचे सध्याचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असणारे कृष्णप्रकाश यांची व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.अंकुश शिंदे यांनी या अगोदर नक्षलग्रस्त भाग गडचिरोलीमध्ये पोलिस उपमहानिरीक्षक पदावर काम केले आहे व सध्या शिंदे मुंबईचे विशेष सुधार सेवेचे पोलीस महासंचालक म्हणुन कार्यरत होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App