Kranti Redkar Share Post for Sameer Wankhede: समीर वानखेडे देशासाठी कशाप्रकारे कसं काम करतो हे फक्त मलाच माहित आहे. असं म्हणत क्रांती रेडकरने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आर्यन खान (Aryan Khan) याच्या अटकेनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे प्रचंड चर्चेत आले. दरम्यान या सगळ्यात आता समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने आता एक खास फोटो शेअर केला ज्यासह तिने खास पोस्टही शेअर केली आहे. Sameer Wankhede: ‘Only I know how much you work for the country’; Kranti shared Padva special post
समीर वानखेडे यांनी आर्यन खानवर केलेली कारवाई खोटी आहे, समीर वानखेडे मूळचे मुस्लिम असून नंतर त्यांनी धर्म परिवर्तन करुन IRS ची नोकरी मिळवली. असे एक ना अनेक आरोप त्यांच्याविरोधात होत असताना आता क्रांती रेडकर यांनी दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर पती समीर वानखेडे यांना औक्षण करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या फोटोसोबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये क्रांतीने असं म्हटलं आहे की, ‘तू देशासाठी किती जीव तोडून काम करतोस हे फक्त मलाच माहिती’ असं म्हणत क्रांतीने आपल्या पतीची पुन्हा एकदा पाठराखण केली आहे. एकीकडे नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडेंवर हल्लाबोल सुरु असताना दुसरीकडे क्रांती रेडकर सातत्याने समीर वानखेडेंची बाजू मांडत होती. समीर वानखेडेंकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतलेला असताना क्रांतीने पुन्हा एकदा एक फोटो शेअर करुन आपण पत्नी म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत हे दाखवून दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App