नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांना बजावलेल्या कारणे-दाखवा नोटीसला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. जात प्रमाणपत्र मिळवताना कोणतीही खोटी माहिती दिली नाही किंवा खोटी कागदपत्रेही दिली नाही, असे त्यानी म्हटले आहे. Sameer Wankhede challenged Show cause Notice
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांना बजावलेल्या कारणे-दाखवा नोटीसला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. जात प्रमाणपत्र मिळवताना कोणतीही खोटी माहिती दिली नाही किंवा खोटी कागदपत्रेही दिली नाही, असे त्यानी म्हटले आहे.
जात प्रमाणपत्र जप्त का करण्यात येऊ नये? याचे स्पष्टीकरण जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने या नोटीसद्वारे वानखेडे यांच्याकडून मागितले आहे. तक्रारी व कागदपत्रे तपासल्यावर वानखेडे मुस्लिम धमार्चे असल्याचे सिद्ध होते, असे म्हणत मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २९ एप्रिल रोजी वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र रद्द किंवा जप्त का करण्यात येऊ नये? याचे स्पष्टीकरण समितीने वानखेडे यांच्याकडून मागितले आहे. ही नोटीस ‘बेकायदा, मनमानी आणि स्वत:चा बचाव करण्याची संधी न देता जारी करण्यात आली आहे, असे वानखेडे यांनी याचिकेत म्हटले आहे. अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असलेल्या महार जातीचा मी आहे. जात प्रमाणपत्र मिळवताना कोणतीही खोटी माहिती दिली नाही किंवा खोटी कागदपत्रेही दिली नाही.
जरी आई धर्माने मुस्लिम असली तरी आपण जन्मापासून हिंदू धमार्चा दावा केला आहे आणि हिंदू प्रथा आणि चालीरीतींचे पालन केले आहे. याचिककर्त्याच्या जन्मावेळी याचिकाकर्त्याच्या वडिलांच्या माहितीशिवाय आणि संमतीशिवाय दाऊद के. वानखेडे असे नाव रुग्णालयाला सांगण्यात आले आणि चुकीची नोंद जन्मनोंदणीमध्ये करण्यात आली, असे याचिकेत म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App