समीर वानखेडेंची जात काढणाऱ्या नवाब मलिक यांच्या विरोधात समीर वानखेडे यांच्या आत्याची पोलीसांमध्ये तक्रार

प्रतिनिधी

औरंगाबाद – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात समीर वानखेडे यांची आत्या गुंफाबाई भालेराव यांनी पोलीसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. sameer wankhede caste row; dyandev wankhede`s sister made police complaint against nawab malik

गुंफाबाई भालेराव यांनी ठाण्यात तक्रार देऊन मंत्री नवाब मलिक यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक ‘ एनसीबी ’चे समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. त्यामुळे आमचे कुटुंब मानसिक तणावात आहे, असे त्यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे. या तक्रार अर्जासोबत गुंफाबाई भालेराव यांनी वंशावळ सादर केली आहे. समीर वानखेडे त्यांचे भाचे असून एकाच कुटुंबाचे सदस्य असल्याचे म्हटले आहे.



अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना वानखेडे यांनी अटक केली होती. या कारवाईमुळे नवाब मलिक हे समीर वानखेडे व कुटुंबाविरोधात आरोप करत आहेत. आर्यन खान याच्या प्रकरणानंतर मलिक यांनी समीर यांच्या जातीबद्दल पत्रकार परिषदेत दावे केले होते. समीर दाऊद वानखेडे असा त्यांच्या नावाचा उल्लेख करत मलिक यांनी ते मुसलमान असल्याचा दावा केला होता.

मात्र समीर वानखेडे यांच्याबाबत हा खोटा प्रचार आहे. नवाब मलिक यांच्या सततच्या या आरोपांमुळे आमच्या सर्व कुटुंबियांची मनःस्थिती बिघडली असून आम्ही तणावात असल्याचे गुंफाबाई भालेराव यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

sameer wankhede caste row; dyandev wankhede`s sister made police complaint against nawab malik

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात