संभाजीनगर दंगली वरून राजकीय आरोप – प्रत्यारोपांचा राडा; पण परिस्थिती पूर्ण नियंत्रणात, 3500 पोलीस तैनात!!


प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील किराडपुरा भागात झालेल्या दगडफेकीनंतर निर्माण झालेल्या तणावावर राजकीय आरोप – प्रत्यारोपांचा राडा सुरू असला तरी संभाजीनगर मधील परिस्थिती पूर्ण नियंत्रणाखाली आहे आणि बंदोबस्तासाठी 3500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी 10 पथके स्थापन करून दंगेखोरांना पकडण्याची मोहीम वेगवान केली आहे.Sambhajinagar Riots: Political Allegations – A Scream of Recriminations; But situation under complete control, 3500 police deployed

रामनवमीच्या पहाटे झालेल्या दंगलीचे मास्टरमाईंड हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. भाजप आणि एमआयएम यांनी मिली भगत करून ही दंगल घडवली आहे, असा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे, तर संभाजीनगर मध्ये दंगल घडवण्याचा काही शक्तींचा डाव असल्याचा इशारा आपण दोन दिवसांपूर्वीच दिला होता. परंतु पोलीस आयुक्तांना ही दंगल रोखता आली नाही, असा आरोप आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे.



महाराष्ट्रात दंगली व्हाव्यात हा मिंधे गटाचा हेतू आहे. त्यासाठी मिंधे गटाच्या टोळ्या कार्यरत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट खुलासा केला आहे संभाजीनगर मधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे तेथे बंदोबस्तासाठी 3500 पोलीस तैनात केले आहेत दंगेखोरांना आणि दगडफेक करणाऱ्यांना कोणत्याही माफ करणार नाही. त्यांना पकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

किराड पुरा भागातील राम मंदिराच्या कमानीची जाळपोळ केली असली तरी प्रत्यक्ष राम मंदिराला कोणताही धोका उत्पन्न झालेला नाही. राम मंदिरात कुठलीही डॅमेज झालेले नाही, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी फेसबुक लाईव्ह करून सकाळी सांगितले होते. दगडफेक करून दंगल घडवणारी टोळकी बटन प्लेयर म्हणजे व्यसनी आहेत. त्यांना पोलिसांनी लवकरात लवकर पकडण्याची मागणी इम्तियाज जलील यांनी केली होती.

राम मंदिराला पालकमंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी भेट दिली.

Sambhajinagar Riots: Political Allegations – A Scream of Recriminations; But situation under complete control, 3500 police deployed

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात