विशेष प्रतिनिधी
सातारा : राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे छत्रपती उद्या ता. 26 फेब्रुवारी पासून मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत यापार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपचे राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे यांनी संभाजीराजे यांच्या उपोषणावर खोचक शब्दात टीका केली आहे. मराठा आरक्षणासह सगळ्याच विषयात राजकारण आणणार असाल तर बोलून बोलून तोंडाची चव गेली, असा टोला त्यांनी संभाजीराजे यांचे नाव न घेता लगावला आहे. Sambhaji Raje’s fast from tomorrow
खासदार संभाजीराजे भोसले मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसणार आहेत. एकूण 10 प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. राज्यातील मराठा समन्वयकांनीही सहभागी होण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या आंदोलनावर नाराजी जाहीर केली आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी देखील संभाजीराजे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली होती. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी जर उपोषण करावे पण स्वतःच्या खासदारकीसाठी ते करू नये, असे नितेश राणे म्हणाले होते तर संभाजीराजे यांनी सर्व समाजाच्या भल्यासाठी उपोषण करावे, असे हरिभाऊ राठोड म्हणाले होते.
आता या मुद्द्यावरून खासदार उदयनराजे यांनी टिप्पणी केली आहे. ते म्हणाले, की मराठा आरक्षण मुद्द्यावर न बोललेले बरे. सगळीकडे राजकारण आणणार असाल तर बोलून बोलून तोंडाची चव गेली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरू असलेल्या कारवाईसंबंधी बोलताना उदयनराजे म्हणाले की हे त्यांचे कर्म आहे. याच जन्मात त्याची परतफेड करावी लागते. या कारवाईचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. जर आरोपांमध्ये तथ्य नसते तर त्या कारवाया झाल्या नसत्या.
अनेक गोष्टी मी उघडपणे बोललो असून केवळ राजकारण म्हणून बोललो नाहीत. याचा परिमाण मतदार, सर्वसामान्यावंर किती होतो याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे. लोकांचा राजकारण्यांवरील विश्वासच उडाला आहे. लोक जेव्हा पाहतात तेव्हा डोळ्यांमध्ये आत्मीयता असायला हवी पण ती आता कमी होत चालली आहे, असेही उदयनराजे म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App