प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच शब्द फिरवला असे थेट शरसंधान साधत संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली. स्वराज्य संघटनेच्या विस्तारासाठी आपण मोकळे झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. Sambhaji Raje withdraws from Rajya Sabha elections by directly attacking the Chief Minister
छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार असे जाहीर केले होते. त्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्याकडून पाठिंबा न मिळाल्याने संभाजी राजे निवडणुकीतून माघार घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता पत्रकार परिषद घेत संभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मी ही निवडणूक लढवणार नाही, ही माघार नाही पण माझा स्वाभिमान आहे, असे संभाजी राजे म्हणाले.
छत्रपती संभाजी राजे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी दोन खासदार माझ्याकडे पाठवले, मला शिवसेना पक्षात सहभागी होण्यास सांगितले. पण मी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर मला मुख्यमंत्र्यांनी स्वत: फोन करुन बोलावले. मला पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करण्यास सांगितले. त्यानंतर मी त्यांना एक प्रस्ताव दिला. शिवसेनेची एक सीट असल्याचे ते म्हणतात तरीही मी माझा प्रस्ताव त्यांना सांगितले, मला अपक्ष निवडणूक लढवणार आहे. मला महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारी द्यावी. मी त्यांना बोललो की तुम्ही विचार करा. मीही करतो, त्यानंतर त्यांच्या मंत्र्यांचा फोन आला, बैठका झाल्या.
शिष्टमंडळांच्या बैठका झाल्या. त्यात त्यांचे जवळचे स्नेही होते. मी शिवसेनेत प्रवेश करावा अशी मुख्यमंत्री यांची इच्छा होती असे त्यांनी मला सांगितले. मी ठाम नकार दिला. मी कोल्हापूरला जात असताना शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आल्या त्यांनी मला शब्द दिला. त्यानंतर ऐकतो तर काय यांनी संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, असे शरसंधान संभाजीराजे यांनी साधले.
हा काय प्रकार आहे म्हणून फोन केला पण, मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला शब्द मोडला. स्वराज्य संघटना वाढवण्यासाठी आता मी मोकळा झालो आहे. गुरुवारपासून अनेक आमदारांनी फोन केले. आमदारांनी माझ्या फॉर्मवर सह्या केल्या त्यांच्या पाठीशी मी आयुष्यभर उभा राहीन, असे संभाजीराजे म्हणाले. ते अपक्ष आमदार कोण हे मी सांगणार नाही. कारण त्यांची स्वतःची इच्छा नाही त्यांच्यावर दबाव होता, असा दावाही संभाजीराजे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App