प्रतिनिधी
नवी दिल्ली : मराठा आरक्षण आणि मराठा समाज या संदर्भातल्या इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर मराठा समाजातील विविध मान्यवरांशी आणि अन्य घटकांशी आपण चर्चा करून भूमिका निश्चित केली आहे. उद्या मुंबईत 11.00 वाजता पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका जाहीर करणार आहे, असे ट्विट राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार संभाजीराजे यांनी केले आहे.Sambhaji Raje will present his position on Maratha reservation in a press conference in Mumbai tomorrow
खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या सहा महिन्यांमध्ये अनेकदा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारला पत्र लिहिली आहेत. त्यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. यापैकी फक्त सारथी संस्थेसंदर्भातली मागणी प्रत्यक्षात सरकारने मंजूर केली आहे. बाकीच्या मुद्द्यांवर अद्याप खासदार संभाजीराजे यांना सरकारने उत्तर दिलेले नाही.
#मराठा_आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचार विनिमय करून मी माझी पुढील दिशा ठरविलेली आहे ; याबाबत उद्या, दि. १४ रोजी स. ११ वा. मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन ती स्पष्ट करणार आहे. — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 13, 2022
#मराठा_आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचार विनिमय करून मी माझी पुढील दिशा ठरविलेली आहे ; याबाबत उद्या, दि. १४ रोजी स. ११ वा. मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन ती स्पष्ट करणार आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 13, 2022
या पार्श्वभूमीवर उद्या संभाजीराजे हे मुंबईतल्या पत्रकार परिषदेत कोणती भूमिका मांडतात?, मराठा आंदोलन संदर्भात ते काही वेगळी भूमिका घेतात का? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठा मोर्चा किंवा तत्सम कोणते आंदोलन उभे करणार का?, असे सवाल आता विचारले जात आहेत. उद्या सकाळी 11.00 वाजता संभाजीराजे हे मुंबईतल्या पत्रकार परिषदेत या संदर्भात खुलासा करण्याची अपेक्षा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App