संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी ते माघार यावरून महाराष्ट्र जे राजकारण रंगले आहे, त्याला अनेक कंगोरे आहेत. अनेक नेत्यांपर्यंत त्याचे धागेदोरे पोहोचले आहेत. पण यातला मूळ मुद्दा आणि प्रश्न बाजूलाच राहत असून त्याचे उत्तर मात्र या राजकीय नाट्यातील पात्रे देताना दिसत नाहीत!! तो म्हणजे संभाजीराजे हे सन 2009 पासून आपले राजकीय आणि सामाजिक निर्णय स्वतंत्रपणे घेतात. आपल्याशी विचारविनिमय करत नाहीत, असे शाहू महाराज यांना इतक्या वर्षांनी पत्रकारांना का सांगावेसे वाटले?? Sambhaji Raje – Shahu Maharaj Disagreement: But who is the owner of the Chhatrapati family?
संभाजीराजे आणि त्यांचे पिताश्री शाहू महाराज यांच्यातले मतभेद संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारी वरून आणि नंतरच्या माघारी वरून महाराष्ट्राच्या समोर आले. स्वतः शाहू महाराजांनी संभाजीराजे यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्याला छेद दिला. संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले होते. मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याचा आरोप केला होता. परंतु, शाहू महाराजांनी मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला असे म्हणणे योग्य नाही, असे सांगत संशयाची सुई देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने वळवली.
पण त्याचवेळी शाहू महाराजांनी राजघराण्यातले मतभेद देखील आपल्या परिभाषेत जनतेसमोर आणले. संभाजीराजे हे 2009 पासून स्वतंत्रपणे निर्णय घेतात. आपल्याशी विचारविनिमय करीत नाहीत. त्यांचे निर्णय व्यक्तिगत पातळीवरचे असतात. त्या निर्णयांचा छत्रपतींच्या घराण्याशी काही संबंध नाही, असे शाहू महाराज म्हणाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने आणि छत्रपतींच्या घराण्याच्या दृष्टीने शाहू महाराजांच्या या वक्तव्यात खरी राजकीय मेख दडली आहे!!
– राष्ट्रवादीतून 2909 चा पराभव
2009 मध्ये संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी देऊन लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यास घेण्याचा सल्ला नेमका कोणी दिला होता?? संभाजीराजे यांच्या विरोधात त्यावेळी राष्ट्रवादीचे एकेकाळचे खासदार सदाशिवराव मंडलिक अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते. सदाशिवराव मंडलिक यांना त्यावेळी “म्हातारा बैल” म्हणून हिणवले गेले होते. सदाशिवराव मंडलिक यांनी ही निवडणूक सिरीयसली घेतली. त्यांनी आपल्याला म्हातारा बैल म्हणणाऱ्यांवर किंवा स्वतः संभाजी राजे यांच्यावर अजिबात वैयक्तिक टीका केली नाही. पण तब्बल 35 हजार मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराजे यांचा पराभव करून सदाशिवराव मंडलिक विजयी झाले होते. संभाजी राजे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली होती हे खरे, पण सदाशिवराव मंडलिक यांच्यामागे कोण उभे होते??, त्यांना रसद कोणी पुरवली होती??, याची उत्तरे त्यावेळच्या वर्तमानपत्रांमध्ये काही प्रमाणात आली होती.
त्यानंतर मात्र संभाजी राजे 2014 पर्यंत राष्ट्रवादीशी अंतर राखून वागले. त्यांची त्यावेळेची नेमकी भूमिका त्यांनी उघड केली नाही. 2014 नंतर महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणीस देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार होण्याची ऑफर दिली. ही ऑफर संभाजीराजे यांनी स्वीकारू नये, असे शाहू महाराजांना वाटत असल्याचे त्यांचे निकटवर्ती सांगतात. परंतु, या काळात पिता-पुत्रांनी मध्ये संवाद नसल्याचे स्वतः शाहू महाराजांनीच उघड केले आहे. कारण 2009 पासूनचे संभाजीराजे यांचे सर्व राजकीय आणि सामाजिक निर्णय आपल्याशी विचारविनिमय न करता ते घेत होते, असे स्वतः शाहू महाराजांनी सांगितले आहे. मग जशी 2009 ची राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्याचा सल्ला संभाजीराजे यांना कोणी दिला होता??, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही, तसेच 2016 मध्ये राष्ट्रपती नियुक्तीची खासदारकी स्वीकारण्याचा सल्ला कोणी दिला??, हे देखील कोणी सांगत नाही.
– राष्ट्रवादीच्या मेळाव्यानंतर काही घडामोडी झाल्या का??
त्यानंतर गेली सहा वर्षे संभाजी राजे स्वतंत्रपणेच आपले राजकीय निर्णय घेत असल्याचे शाहू महाराजांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे. पण आता मात्र काही दिवसांपूर्वी कोल्हापूर मध्ये राष्ट्रवादीचा प्रचंड मेळावा झाला होता त्यानंतर काही राजघराण्यातल्या घडामोडी घडल्या का?? त्यातून संभाजीराजे यांची अपक्ष उमेदवारी ही संकल्पना साकार झाली का?? आणि ती साकार झाल्यानंतर शिवसेना यासर्व जाळ्यात अडकली नाही त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली का?? हेही प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.
– सर्वात कळीचा प्रश्न
पण त्यापुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा आहे, की स्वतः शाहू महाराजांना आज पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना संभाजीराजे स्वतंत्रपणे सामाजिक आणि राजकीय निर्णय घेतात, हे 2009 नंतर पहिल्यांदाच का सांगावेसे वाटले?? यामागे नेमका राजकीय हेतू काय आहे?? किंवा या वक्तव्य मागे नेमके कोण आहे??, या प्रश्नाचे उत्तर ते स्वतः येत नाही किंवा त्याविषयी कुणी भाष्य करताना दिसत नाही.
कोल्हापूरच्या राजघराण्यात मतभेद असल्याचे आज उघड झाले आहे पण या मतभेदांमागचा नेमका बोलवता धनी कोण?? या प्रश्नाचे उत्तर मात्र छत्रपती घराण्याचे वंशज उघडपणे देताना दिसत नाहीत.
संभाजीराजे यांच्या निकटवर्तीयांनी मात्र संजय राऊत आणि शरद पवार यांची नावे घेऊन छत्रपती घराण्यात फूट पाडण्याचे काम त्यांनी केल्याचा आरोप केला आहे. आता हा आरोप खरा आहे का??, हे याचे उत्तर छत्रपती घराण्यातले कुणी देत नाही. ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत संशयाची सुई अनेकांभोवती फिरत राहणार आणि महाराष्ट्रात याची चर्चा होणार हे मात्र नक्की!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App