विशेष प्रतिनिधी
नाशिक : शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकत्र काम केले आहे. प्रकाश आंबेडकर हे त्यांचे नातू तर मी महाराजांचा पणतू आहे. वेळ आली तर मी एक पाऊल पुढे टाकेल. सर्व संघटना एकत्र आल्या तर वंचित सोबत युती होऊ शकते असे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. Sambhaji Raje coalition with prakash ambedkar
नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महायुती आणि महाविकास आघाडीच्या घाणेरड्या राजकारणाला लोक कंटाळलेले आहेत. महाराष्ट्र घडविण्यासाठी राजकीय लढाई सुरू झाली आहे महाराष्ट्रात 75 वर्षांपासून गप्पा सुरु, शाहू फुले आंबेडकर यांच्यावर राजकारण केले जाते. मूलभूत सुविधा सुद्धा दिल्या जात नाही. किती दिवस जनतेला फसवणार ? त्यामुळे १७ तारखेला आमची पुण्यात बैठक आहे. २८८ जागा लढवाव्या लागतील, अशी परिस्थिती आहे. बैठकीत हा निर्णय घेतला जाणार आहे.
साम, दाम आणि दंड सगळी आमची तयारी आहे. प्रस्थापितांना सुद्धा संधी देणार आहे. मात्र तिकडे नाकारले म्हणून आम्ही उमेदवारी देणार नाही. आम्ही सगळं तपासूनच घेणार आहे. जो निवडून येईल तो त्यांच्या पक्षाचा अजेंडा मांडेल. त्यामुळे पडण्यापेक्षा लढायला पाहिजे, असे ते म्हणाले.
संभाजी राजे म्हणाले,मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे. आणखी सविस्तर चर्चा होईल . मला निर्णय घ्यायचा असेल तर मी मनोज जरांगे पाटील यांना विचारेल. मला कमीपणा वाटणार नाही. मनोज जरांगे पाटील यांचा उद्देश आणि माझा उद्देश सारखाच आहे. एकत्र येऊन हेतू साधायचा आहे तर साधता येईल. मात्र मनोज जरांगे पाटील कोणाच्या ऐकण्यातील नाही. त्यांनी स्वतःचे अस्तित्त्व तयार केले आहे.
आरक्षणावर बोलताना संभाजीराजे म्हणाले, राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 50 टक्के आरक्षण दिले. शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन काम केले . आरक्षण सगळ्यांना मिळाले पाहिजे. मराठ्यांना दिलेले आरक्षण दोनदा उडाले आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत .सरकारने जे आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तो योग्य नाही.
मराठा ओबीसी मध्ये भांडण लावले जात आहे, कोणीही आरक्षण विषय हाताळत नाही. ओबीसीत मायक्रो ओबीसी कंटाळले, ओबीसीत कुणाला लाभ होतोय याचे सर्व्हेक्षण व्हायला पाहिजे. २७ टक्के आरक्षण कुणाला जातंय, याच सर्व्हेक्षण व्हायला पाहिजे. सगळे प्रश्न सुटतील. राजकिय इच्छा शक्ती लागेल. आरक्षणावर बसून चर्चा करावी लागेल. आम्ही सत्तेत आलो तर कुणालाही न दुखावता आरक्षण देऊ शकतो .कायद्यात बसवून आम्ही आरक्षण देऊ. पण आरक्षण कसं देता येईल आत्ताच सांगणार नाही
नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, नांदगाव, येवला, इगतपुरी, सिन्नर मधून लढण्यासाठी अनेकांनी फोन केलेत . नाशिकमधून सुरुवात चांगली झाली, महाराष्ट्रातून फोन येतातच आहेत . काल नाशिकला येऊन खुश झालो, आचारसंहिता लागल्यानंतर नाशिकला होतो. कोल्हापूर नंतर माझं नाशिकवर प्रेम आहे. येथील अनेक विषय मला माहिती आहेत. जास्तीत जास्त जागा नाशिकमधून लढणार आहे. मला सुधा नाशिकमधून विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App