विशेष प्रतिनिधी
मुंबई : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप उसळला. त्यावर राजकारण रंगले. मालवणात शिवसेना – भाजप एकमेकांना भिडले. पण माजी खासदार संभाजी राजे यांनी या विषयाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शास्त्रोक्त पद्धतीने बसवण्यात आला नव्हता, याची कल्पना मी त्यावेळीच दिली होती, असे संभाजी राजे म्हणाले. त्याचवेळी आत्तापर्यंत गडकोटांबद्दल न बोलणारे नेते आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल बोलू लागले आहेत, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांना हाणला.
संभाजी राजे म्हणाले :
12 डिसेंबर 2023 रोजी मी नरेंद्र मोदींना पत्र दिलं. पुतळ्याच काम पूर्णत्वाला नेललं नाही. त्यामुळे हा पुतळा बदलावा असं मी 12 डिसेंबर 2023 रोजी पत्रात नमूद केलं होतं.
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला महाराष्ट्राच्या दृष्टीने ही दुर्देवी बाब आहे. जनता आपल्या भावना व्यक्त करणार, जे घडायला नको होतं, ते घडलं.
Jay Shah : जागतिक क्रिकेटवर भारताचा दबदबा; ICC च्या अध्यक्षपदी जय शाह; पाचवे भारतीय अध्यक्ष!!
पुतळा गावात उभा करायचा असेल, तर अनेक जाचक अटी असतात. अनेकांना परवानगी सुद्धा मिळत नाही. खुद्द पंतप्रधान, राष्ट्रपती पुतळ्याच्या उद्घाटनासाठी येणार असतील, तर अनेक जाचक अटी असतात. या जाचक अटींच पालन झालं होतं का? कलासंच न्यायालयाने परवानगी दिली होती का? हे प्रश्न पुढे आले आहेत.
गड किल्ल्यांवरील अतिक्रमणांविरोधात नेते बोलले नाहीत!!
या घटनेत राजकारण बाजूला ठेण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या बाबतीत दुमत असू शकत नाही. पण काय चुकतय यावर चर्चा झाली पाहिजे. मला आश्चर्य वाटतं, मी गड-किल्ले अतिक्रमण मुक्त झाले पाहिजेत हा विषय हाती घेतला, तेव्हा या राजकीय नेत्यांनी अतिक्रमणाविरोधात भूमिका घेतली नाही. आता मात्र हे नेते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल बोलतात. गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारांनी किती खर्च केला आहे महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगावे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App