प्रतिनिधी
मुंबई : मिशी कापणे, हातपाय तोडणे यानंतर आता संभाजी भिडे गुरुजींना काँग्रेसच्या माजी राज्यमंत्र्याची थेट खुनाची धमकी दिली आहे. Sambhaji Bhide has now received a direct death threat from the former Congress Minister of State
महात्मा गांधी, महात्मा फुले आदी महापुरुषांविषयी संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्ये केल्यानंतर अमरावती पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांना नोटीस धाडली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ठाण्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तो गुन्हा अमरावती पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर संभाजी भिडे गुरुजी हिंदुत्वाचे काम करत असले तरी कोणत्याही महापुरुषाची बदनामी करण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यांनी बदनामीकारक वक्तव्य केली असतील, तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही फडणवीसांनी आज विधानसभेत दिली.
मात्र दरम्यानच्या काळात संभाजी भिडे गुरुजींना मिशी कापणे, हातपाय तोडणे अशा धमक्याही आल्या. त्यानंतर आता माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी संभाजी भिडे गुरुजींचा खून करण्याची धमकी दिली आहे. तसे पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. संभाजी भिडे गुरुजींना अटक केली नाही, तर मी त्यांचा मर्डर करीन. त्याची जबाबदारी गृहमंत्री म्हणून आपल्यावर राहील, अशी धमकी सुबोध सावजी यांनी या पत्रात दिली आहे.
सुबोध सावजी हे 1978 पासून 1995 पर्यंत आमदार होते. तसेच 1991 ते 93 या काळात काँग्रेस सरकारमध्ये राज्यमंत्री होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more