औरंगाबादेत पोलिसांच्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप, संतप्त नातेवाइकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

Saloon Owner dies in Aurangabad after police action, angry relatives at osmanpura police station

Saloon Owner dies in Aurangabad : शहरातील उस्मानपुऱ्यात दुकान उघडून निर्बंध मोडल्याने पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. सलून चालकाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाइकांनी मृतदेह घेऊन उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत दोषींविरुद्ध कारवाईची मागणी केली. 14 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेनंतर शेकडो नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. फिरोज खान कादिर खान असे मृत सलून चालकाचे नाव आहे. Saloon Owner dies in Aurangabad after police action, angry relatives at osmanpura police station


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : शहरातील उस्मानपुऱ्यात दुकान उघडून निर्बंध मोडल्याने पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. सलून चालकाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाइकांनी मृतदेह घेऊन उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत दोषींविरुद्ध कारवाईची मागणी केली. 14 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेनंतर शेकडो नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. फिरोज खान कादिर खान असे मृत सलून चालकाचे नाव आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात विविध ठिकाणी निर्बंध लागू आहेत. उस्मानपुरा परिसरात फिरोज यांचे सलून आहे. सलून सुरू असल्याने पोलिसांनी कारवाई केली. कारवाईच्या वेळी पोलिसांनी सलून चालकाला मारहाण केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. यामुळेच फिरोज खान यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. तथापि, परिसरातील एका दुकानाबाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांनी सलून चालकाला मारहाण करण्यापूर्वीच तो कोसळल्याचे दिसून आले आहे. तथापि, सलून चालकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

तथापि, जोपर्यंत दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल होऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. पोलीस स्टेशनसमोर जमलेल्या जमावाला आवरण्यासाठी पोलिसांनी दंगा काबू पथकाला पाचारण केले होते. पोलिसांनी जमावाची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. तथापि, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी 14 तारखेलाच उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली केली. परंतु आता काही माध्यमांनी जारी केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या फुटेजनुसार पोलिसांनी हात उचलण्याआधीच सलून चालक कोसळल्याचे दिसून येत असल्याने फिरोज खान यांच्या मृत्यूविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

Saloon Owner dies in Aurangabad after police action, angry relatives at osmanpura police station

महत्त्वाच्याा बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात