प्रतिनिधी
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून पगार वेळेत होत नसल्याने आणि इतर मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला होता. एसटी कर्मचाऱ्यांकडून आत्मक्लेष आंदोलन सुरू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्या केल्या.Salary of ST employees on 7th of every month; Announcement of Chief Minister Eknath Shinde
अखेर या सर्व प्रश्नांवर तोडगा निघाला आहे. दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत राज्य सरकार एसटी महामंडळाला पगारासाठी आवश्यक निधी देणार आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होतील, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे. मंगळवारी दुपारी विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळावा, यासोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावेळी १६ मागण्यासंदर्भात जी सहमती झाली होती त्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App