महाराष्ट्रात सरकारी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांना बायोमेट्रिक हजेरीनुसारच वेतन आणि भत्ते

  • आरोग्य विभाग आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी हॉस्पिटल मधील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांना आता बायोमेट्रिक हजेरीनुसार वेतन आणि भत्ते मिळणार आहेत. आरोग्य विभाग आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा निर्णय घेतल्याने आरोग्य विभागात डॉक्टरांना चांगलाच घाम फुटला आहे. Salary and Allowances of Government Doctors, Medical Officers in Maharashtra based on Biometric Attendance

तुकाराम मुंढे यांनी वैद्यकीय अधिका-यांसाठी एक अनोखा फतवा काढला असून, आता डॉक्टरांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही बायोमेट्रिक हजेरीच्या नुसारच त्यांना त्यांचे वेतन आणि भत्ते देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



शासकीय रुग्णालयांत नेमणूक झालेले डॉक्टर खासगी रुग्णालयात देखील सेवा देत असतात. त्यामुळे हे करत असताना शासकीय रुग्णालयांत उशिरा येणे किंवा सुट्टी घेऊन हजेरी पटावर हजर असल्याचा शेरा मारणे असे प्रकार करण्यात येतात. त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बायोमेट्रिक हजेरीनुसार, डॉक्टर व वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतन आणि भत्ते देण्याचा फतवा काढला आहे.

नाहीतर शिस्तभंगाची कारवाई होणार

त्याचप्रमाणे शासकीय सेवेत कार्यरत असणा-या आपल्या कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिका-यांची नावे, खासगी रुग्णालयांची नोंद, अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांची तपशीलवार माहितीसह यादी सदर करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.तसेच ही पद्धत अंमलात न आणल्यास अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे दांडीबहाद्दर आणि बेजबाबदार अधिकारी आणि डॉक्टरांना चांगलाच चाप बसणार आहे.

Salary and Allowances of Government Doctors, Medical Officers in Maharashtra based on Biometric Attendance

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात